शिरूर-हवेली मतदार संघात 10 उमेदवार रिंगणात

शिरुर : पोलीसनामा ऑनलाइन – शिरुर हवेली मतदार संघातून विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा-सेना युतीचे उमेदवार बाबुराव पाचर्णे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अशोक पवार यांसह एकूण १० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. शिरुर विधानसभा मतदार संघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा मुदतीत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदिप कंद, माजी सभापती मंगलदास बांदल, ज्ञानेश्वर कटकेे, डाॅ. चंद्रकांत कोलते आदी प्रमुख उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. एकूण १० उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले असून भाजप आणि राष्ट्रवादीत मुख्य लढत होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

शिरुर विधानसभा निवडणूकीकरिता १८ उमेदवारांनी २२ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छानणीत सुजाता अशोक पवार, नगरसेवक नितीन पाचर्णे व रोहिदास उद्रे यांचे उमेदवारी अर्ज बाद झाले होते.

निवडणूक रिंगणात राहिलेले उमेदवार पुढील प्रमाणे
भाजप – आमदार बाबूराव पाचर्णे, राष्ट्रवादी कॉंग्रेस – माजी आमदार अशोक पवार, बसपा – रघुनाथ भवार, मनसे – कैलास नरके, वंचित बहुजन आघाडी – चंदन सोंडेकर, बहुजन मुक्ती पार्टी – अमोल लोंढे, संभाजी ब्रिगेड पार्टी – चंद्रशेखर घाडगे, तर अपक्ष म्हणुन ॲड नरेंद्र वाघमारे, नितीन पवार, सुधीर पुंगालिया आदी निवडणूक रिंगणात कायम राहिले .

Visit : Policenama.com