शिवसेनेचा अंतर्गत वाद ‘उफाळला’, नगरसेवकाच्या कार्यालयाची ‘तोडफोड’

बदलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील विधानसभा निवडणुक एक महिन्यावर आली असताना बदलापूरमध्ये शिवसेनेतील अंतर्गत वाद उभाळून आला आहे. शिवसेनेच्या नगरसेवकानेच शिवसेनेच्या नगरसेवकाच्या कार्यालयाची तोडफोड केली. हा प्रकार आज (बुधवार) सकाळी घडला. विधानसभेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेचे नगरसेवक शैलेश वडनेरे इच्छुक असल्याने नाराज शिवसेना नगरसेवकांनी ही तोडफोड केल्याचे सांगण्यात येत आहे. बदलापूरमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असे चित्र सध्या निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

बदलापुरात शिवसेनाविरूद्ध शिवसेना... या नगरसेवकाच्या कार्यालयाची केली तोडफोड

आगामी विधानसभेच्या तोंडावर शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे आणि नगरसेवक शैलेश वडनेरे यांच्यातील वाद शिवसेनेच्या दृष्टीने चिंतेची बाब ठरली आहे. पालिकेच्या सर्वसाधारण सभेपूर्वी म्हात्रे आणि वडनेरे यांच्यात वाद झाले होते. त्या वादाचे पडसाद सभा संपल्यानंतर पहायला मिळाले. या दोघांमधील वाद शिवसेनेची डोकेदुखी ठरू शकते असा सूर आता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये असून वेळीच यामध्ये वरिष्ठांनी लक्ष घालण्याची गरज असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे.

मागील वर्षभरापासून म्हात्रे आणि वडनेरे यांच्यामध्ये राजकीय वाद निर्माण झाले आहेत. त्यातच वडनेरे हे गेल्या सहा महिन्यापासून विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचाराला लागले होते. त्यामुळे राजकीय दरी आणखीनच वाढली आहे. याच वादातून काही शिवसैनिकांनी वडनेरे यांच्या कार्यालयात जाऊन तोडफोड केली.

आरोग्यनामा ऑनलाइन –

You might also like