इनकमिंगचा साईड ‘इफेक्ट’ ! भाजप- शिवसेना युतीच्या 50 जागा ‘या’ कारणामुळे ‘धोक्यात’ ?

पोलीसनामा ऑनलाईन टीम : राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून भाजप-शिवसेनेचे पारडे जड असल्याचे मानले जात आहे. मागील काही काळापासून या दोन्ही पक्षांनी विरोधक काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते गळाला लावल्याने विरोधकांना कमजोर करण्याबरोबरच त्यांची ताकदही वाढली असल्याचे बोलले जात आहे. परंतु आता हीच गोष्ट भाजप-शिवसेनेसाठी काहीशी डोकेदुखीची ठरत असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान दोन्ही पक्षांतील नेत्यांच्या इनकमिंगमुळे अनेक प्रस्थापित नाराज झाले असून त्यामुळे बंडखोरी वाढल्याचे दिसून येत आहे. हा नेत्यांच्या इनकमिंगचा साईड इफेक्ट असल्याचे देखील म्हणता येईल. जवळपास ५० मतदारसंघांमध्ये बंडखोरांनी भाजप-सेना युतीची डोकेदुखी वाढवली असून विजय अवघड केला आहे.

दरम्यान, बाहेरून आलेल्या उमेदवारांना थेट तिकीटे दिल्याने भाजप शिवसेनेतील अनेक नेते नाराज झाले आहेत. त्यातील काहींनी बंद करत पक्षाच्या विरोधात काम करणे सुरु केले आहे. विदर्भ आणि मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघात उमेदवारीसाठी होणाऱ्या स्पर्धेतून महायुतीला बंडखोरीचा सामाना करावा लागत आहे.

अध्यक्ष महादेव जानकर यांनी देखील जागावाटपाबद्दल नाराजी व्यक्त करत भाजपवर निशाणा साधला आहे. त्यामुळे राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली असल्याने ते भाजपला मदत करतील काय ? हा देखील प्रश्न आहे. तथापि निवडणुकीत महायुतीसोबतच राहणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. भाजपने रासपच्या उमेदवारांना स्वत:चा (भाजपचा) एबी फॉर्म दिल्यामुळे चिडलेल्या जानकर यांनी ‘दौंडला राहुल कुल आणि जिंतूरला मेघना बोर्डीकर हे आता आमचे उमेदवार नाहीत’ असं देखील म्हटलं.

visit : policenama.com 

 

You might also like