दलालांच्या दिखाव्याला मुख्यमंत्री फडणवीस बळी पडले, ‘या’ शिवसेना खासदाराची ‘खोचक’ टीका

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाईन – नाणार होऊ शकतो असे वक्तव्य करणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर शिवसेनेच्या खासदारांनी खोचक टीका केली आहे. दलालांच्या दिखाव्याला मुख्यमंत्री बळी पडले अशी टीका शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने गेल्या दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री रत्नागिरी जिल्ह्यात आले होते. त्यावेळी त्यांनी नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबतच्या वक्तव्याच्या पार्श्वभुमीवर रविवारी नाणार रिफायनरी पकल्प विरोधी शेतकरी, मच्छिमार संघटनेची तारळ येथे सभा घेतली. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निषाणा साधला.

आमचं नातं लाल मातीशी आहे. मग आम्हाला रिफायरनरी नको, दलालांच्या दिखाव्याला मुख्यमंत्री बळी पडले. शिवसेना स्थानिक जनतेसोबत आहे, अशा शब्दात खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. आगामी विधानसभा निवडणुकीच्य तोंडावर भाजप-शिवसेना युती होणार की नाही यावर तर्क वितर्क लढवले जात असताना शिवसेनेच्या खासदाराने मुख्यमंत्र्यांबाबत असे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात युतीबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत.

एकच जिद्द रिफायनरी रद्द अशी घोषणा विनायक राऊत यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांना येथील जनतेचे मत जाणून घ्यायचे असेल तर समोरासमोर चर्चेला या, आव्हान खसदार राऊत यांनी दिले आहे. जे शिवसैनिक प्रकल्प समर्थनाची बाजू घेत आहेत, त्यांच्यावर हाकालपट्टीची कारवाई करणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. रिफायनरी प्रकल्पाबाबत शिवसेनेने विरोधी भूमिका घेतली असून त्यांच्या या भूमिकेचा युतीवर परिणाम होणार का ? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Visit – policenama.com 

You might also like