गद्दारी भिनलेले कुटूंब… आमदारकी दिली तरी गद्दारी, उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. गद्दारी भिनलेलं कुटूंब… आमदारकी दिली तरीही गद्दार झाले. सगळं आपल्याच घरात अशी त्यांची मानसिकता आहे. अशा शब्दात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यावर घणाघाती टीका केली.

औरंगाबादमध्ये थोडी गडबड झाली आणि त्याठिकाणी हिरवा झेंडा फडकला. आता नांदेडमध्ये हिरवा फडकू देऊ नका, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी मतदारांना केले. शिवसेनेच्या वचननाम्यावर टीका करणाऱ्यांचा समाचार घेताना उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. आमच्या वचननाम्यावर कोण टीका करतय तर शरद पवार. 10 रुपयांत जेवण देणार पण त्या जेवणात काँग्रेस-राष्ट्रवादीवाले विरोधाचे खडे टाकत असल्याची टीका त्यांनी केली.

पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांचे फोटो लावून कामाची जाहिरात केली जाते. त्याकामात शिवसेनेचा सिंहाचा वाटा आहे. जे मुद्दे पटले नाही त्याला विरोध केला. शिवसेना सत्तेला बांधील नाही. शिवसेना लोकांना बांधील आहे. असे उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात सांगितले. त्यापूर्वी त्यांची सिल्लोड येथे सभा झाली. या सभेत त्यांनी अब्दुल सत्तार आपल्यासोबत आहेत उद्या सत्ता आपल्या हातात येईल असे सांगितले. शेवटी वाघ हा एकटाच लढून जिंकत असतो असे म्हणत शहरातील बंडखोरांना त्यांनी टोला लगावला.

Visit : policenama.com
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like