विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादीला खिंडार ; ‘या’ युवा नेत्याच्या हाती आता भाजपाचा झेंडा

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर सर्व पक्षांमध्ये जोरदार तयारी सुरु आहे. भाजपने फोडाफोडीचे राजकारण करण्यास सुरुवात केली आहे. तर राष्ट्रवादीही जोरदार तयारी करत आहे. परंतू सोलापूरमधील सांगोल्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. सांगोल्याचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष चेतनसिंह केदार यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. चेतनसिंह केदार यांनी महसुल मंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.

चेतनसिंह केदार यांनी माजी उपनगराध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. त्यांच्या भाजप प्रेवशाने राष्ट्रावादी काँग्रेसला मोठे नुकसान झाले आहे. तसंच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांना मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.

माढा लोकसभा मतदारसंघात सांगोला तालुक्यातील लोकांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे भविष्यात प्रादेशिक पक्षात न राहता तालुक्यातील जनतेला न्याय देण्यासाठी आपण भाजपमध्ये प्रवेश करत आहोत, असं चेतनसिंह केदार यांनी यावेळी म्हटलं. मात्र त्यांच्या या वक्तव्यावरून नेत्यांचा आपल्याच पक्षावर विश्वास राहिला नाही असंच चित्र दिसत आहे.

दरम्यान, यावेळी चंद्रकांत पाटलांनी अनेक दावे केले. काँग्रेस- राष्ट्रवादीचे काही आमदार या आठवड्यात राजीनामे देत भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावा चंद्रकांत पाटलांनी केला आहे. तसंच यावेळी चंद्रकांत पाटल म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेतृत्त्वाचा आत्मविश्वास खचला आहे. ते राजीनामा देवून हातपाय गाळत आहेत. त्यामुळे त्यांचे आमदारही आता राजीनामा देतील, असं पाटील म्हणाले.

निवडणुकीला सहा किंवा त्यापेक्षा जास्त महिने बाकी असताना राजीनामा दिला तर पोटनिवडणूक होते. पण आता तर निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर आली आहे. त्यामुळे या आठवड्याभरात अनेक आमदार राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावाच चंद्रकांत पाटलांनी केला आहे. त्यामुळे राष्ट्रावादीच्या गोटात चर्चांना उधाण आले आहे. तसंच कोण राजीनामा देऊ शकतात यावरही चर्चा सुरु झाली आहे.

Loading...
You might also like