अबब ! उदयनराजेंपेक्षा देखील समाजवादी पार्टीचे अबू आझमी यांची संपत्‍ती जास्त, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली असून अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. यामुळे सर्वच पक्षाचे उमेदवार सध्या अर्ज दाखल करण्याच्या गडबडीत आहेत. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवाराला प्रतिज्ञापत्र देखील द्यावे लागते. या प्रतिज्ञापत्रामध्ये उमेदवाराला आपलं उत्पन्न, स्थावर – जंगम मालमत्ता, दाखल असलेले गुन्हे यांचा तपशील द्यावा लागतो. त्यामुळे आपला उमेदवार किती श्रीमंत आहे हे मतदारांपुढे येत असून श्रीमंत उमेदवाराची जोरदार चर्चा होत असते.

या सगळ्यामध्ये बाजी मारली आहे ती मुंबईतील भाजपचे उमेदवार मंगलप्रभात लोढा यांनी. लोढा यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात तब्बल 500 कोटींची संपत्ती असल्याचे सांगितले आहे. तर साताऱ्यातून लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उभे असलेले भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यापेक्षा अबू आझमी यांची संपत्ती जास्त असल्याची माहीती समोर आली आहे.

उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ते साताऱ्यातून लोकसभेची पोटनिवडणूक लढवत आहेत. तर समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी हे मुंबईतल्या मानखुर्द शिवाजीनगरमधून विधानसभेसाठी उभे आहेत. आझमी यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात 209 कोटी 8 लाख रुपयांची संपत्ती असल्याचे जाहीर केले आहे. तर उदयनराजे भोसले यांच्याकडे 152 कोटी 22 लाखांची संपत्ती आहे, असे त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दिलं आहे.

Visit : Policenama.com