छगन भुजबळ राष्ट्रवादीत राहणार की नाही ! खा. सुप्रिया सुळे यांनी सांगितलं, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांनी राष्ट्रवादीमधून भाजप-शिवसेनामध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा मध्यंतरी होती. तर छगन भुजबळ यांनी आपण कोठेही जाणार नसल्याचे सांगत मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी योग्य असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी देखील छगन भुजबळ शिवसेनेत जाणार नाहीत ते राष्ट्रवादीतच राहणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

पुणे महापालिकेत एका कार्यक्रमसाठी आल्या होत्या. कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्या बोलत होत्या. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्या म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मागील पंधरा वर्षात संघर्षच केला आहे. या निवडणुकीत संघर्ष करून उभा उभा राहिल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

अमित शाह यांच्या टीकेला उत्तर
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, शरद पवार यांनी मागील 50 वर्षात राज्यासाठी काय केले, अमित शाह महाराष्ट्रात आल्यावर शरद पवार यांच्यावर टीका करतात. बाहेरच्या व्यक्तीने येऊन शरद पवारांनी काय केले हे सांगण्याची गरज नाही. राज्यातील जनतेला माहिती आहे शरद पवारांनी राज्यासाठी काय केले ते आणि शरद पवार काय आहेत हे देखील माहित आहेत, अशा शब्दात त्यांनी अमित शाह यांच्यावर निषाणा साधला.

आरोग्यविषयक वृत्त