2014 मध्ये केलेल्या चुकीची शिक्षा भोगत आहेत शरद पवार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सामनाच्या संपादकीयमधून मोठा टोला हाणण्यात आला आहे. सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधून आमदार आणि नेते मोठ्या प्रमाणात बाहेर पडून सत्ताधारी शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे सध्या मोठ्या प्रमाणात विरोधी पक्षाला भगदाड पडत असून हा विरोधी पक्षांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

अनेक आमदारांनी पक्ष सोडल्यानंतर शरद पवार यांनी जे सोडून गेले ते कावळे व आता उरलेल्या मावळय़ांच्या जोरावर पक्षबांधणी करू, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर आता सामनाच्या अग्रलेखामधून त्यांच्यावर टीका करण्यात आली आहे. सामनाच्या अग्रलेखामध्ये त्यांच्यावर टीका करताना लिहिले आहे कि, ‘राष्ट्रवादीत पंधरा वर्षे राहून सत्तेचे दाणे, वैरण खाऊन या कावळय़ांचे मावळे होऊ शकले नाहीत. कावळेच ते, शेवटी कावळेच राहिले’. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला शरद पवार काय उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

काय म्हटले आहे सामनाच्या संपादकीयमध्ये

आम्ही संकटकाळी जी भाषा वापरली तीच भाषा वापरून आज शरद पवार त्यांच्या कार्यकर्त्यांना भावनिक साद घालत आहेत. सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठे भगदाड पडले असून खिंडार सारखे शब्द देखील कमी पडतील. शरद पवार यांच्याविषयी संपूर्ण आदर असला तरी आता त्यांचे राजकारण संपुष्टात आले असल्याची टीका देखील यामध्ये करण्यात आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like