…तर पवारांची औलाद सांगणार नाही : अजित पवार

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – विजयसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीने भाजपमधून आलेले उत्तम जानकर यांना माळशिरस विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उत्तम जानकर यांच्या प्रचाराची सुरुवात वेळापूर येथून केली. वेळापूरचे असलेले उत्तम जानकर यांनी प्रचाराच्या पहिल्या सभेला शक्ती प्रदर्शन करत निवडणूक रंगतदार होणार असल्याचे संकेत दिले आहेत.

विजयसिंह मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे या ठिकाणची लढत राष्ट्रवादीसाठी महत्त्वपूर्ण आहे. अजित पवार यांनी या मतदारसंघाचे महत्त्व ओळखत तुफान टोलेबाजी करत सरकारला धारेवर धरले. तसेच आमच्या हाती सत्ता दिल्यास तीन महिन्यात सात बारा कोरा नाही केला तर पवारांची औलाद सांगणार नाही, असे आश्वासन दिले. यावेळी अजित पवार यांनी फडणवीस सरकारच्या कर्जमाफीबद्दल अतिशय तिरकस शब्दात टीका केली. या सरकारला शेतीचे काही कळत नसल्याचे सांगताना यांना तेल्याही कळत नाही आणि लाल्याही कळत नाही असा टोला लगावला.

कडकनाथ प्रकरणावर निशाणा साधताना अजित पवार म्हणाले, सदाभाऊ खोत यांच्यावरही शेरेबाजी केली. ज्यांनी बँका बुडवल्या त्यांच्यावर हे पांघरुन घालत आहेत, असे सांगत मोहिते पाटलांना टोला लगावला. ही निवडणूक फार महत्त्वाची असून प्रस्थापितांच्या विरोधातील ही लढाई आपल्याला जिंकायची आहे असे सांगत भाजपला आलेला सत्तेचा माज उतरवण्यासाठी आघाडीच्या हातात सत्ता द्या असे आवाहन त्यांनी केले.

Visit : Policenama.com