सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – Maharashtra Assembly Election 2024 | सांगली विधानसभा मतदारसंघात (Sangli Assembly Constituency) काँग्रेसच्या उमेदवारीवरून (Congress Candidate In Sangli Assembly) रस्सीखेच सुरु आहे. पृथ्वीराज पाटील (Prithviraj patil) आणि जयश्री पाटील (Jayshree Patil) यांनी या जागेवर दावा केला आहे. दरम्यान यावर तोडगा काढण्यासाठी आमदार विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) आणि खासदार विशाल पाटील (Vishal Patil) यांनी जयश्री पाटील यांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी ‘ यंदा जयश्री ताईंचाच हक्क आहे’, अशी आग्रही भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली.
‘सांगली विधानसभा निवडणुकीत एकाने लढावे आणि एकाला आगामी विधान परिषद निवडणुकीत संधी दिली जावी,’ असा तोडगा विश्वजित कदम यांनी काढला. त्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांच्यासह सर्वच नेत्यांशी चर्चा झाली आहे.
अगदी खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी देखील ‘सांगली’ साठी एक विधान परिषद देण्याचे मान्य केले आहे, असे आमदार कदम यांनी स्पष्ट केले. त्यामुळे दोन्ही नेत्यांनी वाद टाळून एकमताने निवडणुकीला सामोरे जाण्याचे आवाहन विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी केले.
“सांगली विधानसभा मतदारसंघातील दोन्ही इच्छुकांशी चर्चा सुरु आहेत. गुरुवारी जयश्री वहिनींशी चर्चा झाली. योग्य तोडगा निघेल. मी लवकरच त्याबाबत जाहीर भूमिका मांडणार आहे”, असे आमदार विश्वजित कदम यांनी म्हंटले आहे.(Maharashtra Assembly Election 2024)
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
पोलीसनामाच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/policenamaa