Maharashtra Assembly Election 2024 | बंडखोरांना रोखण्यासाठी फडणवीसांकडून सांगलीत थेट चार्टर फ्लाईट; मात्र बंडखोरांनी चर्चेचा प्रस्ताव धुडकावला

Woman Vandalises Devendra Fadnavis's Office | Woman barges into Devendra Fadnavis' Mantralaya room and vandalises it; The issue of security is back in the spotlight.

सांगली: Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर झालेल्या बंडखोरीनंतर अपक्ष उमेदवारांची नाराजी दूर करण्यासाठी नेतेमंडळींचे प्रयत्न सुरू आहेत. महायुतीतील (Mahayuti) बंडखोरी रोखण्यासाठी नेत्यांनी अपक्ष उमेदवारांची मनधरणी करण्यास सुरुवात केली आहे.

भाजपमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी विविध नेत्यांकडे त्यासाठी जबाबदारी सोपविली आहे. तसेच काही बंडखोरांशी थेट फडणवीस संपर्क साधत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (दि.३१) सांगलीमधील बंडखोरांना रोखण्यासाठी थेट चार्टर फ्लाईट पाठवून दिले होते.

मात्र, चार्टर फ्लाईटमध्ये बसण्यासाठी शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांनी स्पष्ट नकार दिला. दुसरीकडे, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री आज चंद्रकांत पाटील सुद्धा जतमध्ये तमनगौडा रवी पाटील यांच्या भेटीसाठी पोहोचणार आहेत. सांगलीमधील सर्वच जागांसाठी भाजपकडून बंडखोरांना रोखण्यासाठी ताकद लावली आहे. कोणत्याही परिस्थितीत बंडखोरांना शांत करण्यासाठी पावले उचलली जात आहेत.

शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे आणि तमनगौडा रवी पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा ठाम पवित्रा घेतला आहे. सांगली विधानसभेला भाजपमधून शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांनी बंडखोरी केली आहे. जत विधानसभेला तमनगौडा रवी पाटील यांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांनी चर्चेचा प्रस्ताव धुडकावला आहे.

Total
0
Shares
Related Posts