Maharashtra Assembly Election 2024 | ‘महायुतीला 3 अंकी संख्याही गाठता येणार नाही, तर मविआ 183 जागा…”, काँग्रेसच्या बड्या नेत्याचे भाकीत

Maharashtra Assembly Election 2024 | congress leader prithviraj chavan said mahayuti will not get three digit number in vidhansabha election

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीची लगबग सुरु झालेली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) जागावाटप अंतिम टप्प्यात आलं आहे. आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते अशी परिस्थिती आहे. नेत्यांचे दौरे वाढले आहेत. इच्छुक उमेदवार ज्या पक्षातून तिकीट मिळेल त्याठिकाणी पक्ष प्रवेश करताना दिसत आहेत. दरम्यान विधानसभेचे चित्र नेमके काय असेल याबाबत विविध दावे केले जात आहेत.

कराड दक्षिण तालुका काँग्रेस कमिटी, पुणे पिंपरी चिंचवड रहिवासी यांच्यातर्फे निगडी प्राधिकरण या ठिकाणी असलेल्या ग.दि. माडगूळकर सभागृहात स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार समीरण वाळवेकर यांनी पृथ्वीराज चव्हाण यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी महाविकास आघाडी १८३ जागा जिंकेल असा विश्वास व्यक्त केला. तर महायुतीला तीन अंकी संख्याही गाठता येणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला ३१ जागा मिळाल्या. ६५ टक्के जागा आम्ही जिंकलो. या गोष्टीचा विचार केला तर आम्ही विधासभा निवडणुकीत १८३ जागा जिंकू शकतो, महायुतीचा विचार केला तर ते तीन अंकी संख्याही गाठतील की नाही अशी स्थिती आहे.” असं भाकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वर्तवले आहे.(Maharashtra Assembly Election 2024)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

पोलीसनामाच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/policenamaa

Amol Kolhe On Jayant Patil | ‘…तर राष्ट्रवादीतील सर्वोच्च पद जयंत पाटलांना मिळणार”, अमोल कोल्हेंच्या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या; राजकीय वर्तुळात चर्चा

Pune Crime Branch News | खंडणीच्या गुन्ह्यातील एक वर्षापासून फरार आरोपी जेरबंद

Shivsena Shinde Group News | शिवसेना शिंदे गटाच्या बड्या नेत्याचे खळबळजनक वक्तव्य; म्हणाले – ‘…तर राज्यात काँग्रेसचाच मुख्यमंत्री होणार’

Harshvardhan Patil | हर्षवर्धन पाटलांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; झोपेबाबतच्या विधानावर म्हणाले – ‘मला वाटतं की…’

Total
0
Shares
Related Posts