Maharashtra Assembly Election 2024 | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ‘त्या’ कृतीवर काँग्रेस नेत्याचे टीकास्त्र; म्हणाले – ‘मुख्यमंत्री पदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे’

Anjali Damania On BJP | The power and the opposition party are also our own, BJP's new move? Eknath Shinde in the opposition party? The claim created excitement in political circles

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ सर्वपक्षीय नेते सभा, रॅली, बैठका घेत आहेत. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा ताफा जात असताना संतोष कटके (Santosh Katke) या तरुणाने साकीनाका (Sakinaka Mumbai) परिसरात त्यांचा ताफा (दि.११) अडवण्याचा प्रयत्न केला. या तरुणानं मुख्यमंत्र्यांकडे पाहून गद्दार, गद्दार अशी घोषणाबाजी केली. यानंतर संतप्त झालेले मुख्यमंत्री संतोष कटके या तरुणाला जाब विचारण्यासाठी मध्यवर्ती कार्यालयात गेले. शिंदेंच्या या कृतीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.

या घडलेल्या प्रकारानंतर मंगळवार (दि.१२) या तरुणाने ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर काँग्रेसचे नेते आणि उमेदवार नसीम खान (Naseem Khan) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ” घडलेला प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. याच्यावर आम्ही कोणतंही राजकारण करत नाही. परंतु एका तरुणानं जर घोषणाबाजी केली, तर मुख्यमंत्र्यांनी गाडीतून खाली उतरून जाब विचारणं अत्यंत चुकीचं आहे.

मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे. महाराष्ट्राला अनेक चांगल्या मुख्यमंत्र्यांची परंपरा लाभली आहे. गाडीतून खाली उतरून जाणं हे मुख्यमंत्रीपदासाठी अशोभनीय आहे”, असे नसीम खान यांनी म्हंटले आहे.

Total
0
Shares
Related Posts