Maharashtra Assembly Election 2024 | ‘धनंजय मुंडेंनी कमळ घेतलं असतं तर बरं झालं असतं’, प्रचारसभेत पंकजा मुंडेंची फटकेबाजी; म्हणाल्या – ‘लोकसभेला भावाने प्रचार केला…’

Maharashtra Assembly Election 2024 | 'It would have been better if Dhananjay Munde had taken the lotus', Pankaja Munde lashed out at the campaign meeting, said - 'Bha campaigned in the Lok Sabha...'
file photo

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – Maharashtra Assembly Election 2024 | राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाल्यानंतर राजकीय समीकरणं बदलली आहेत. त्यामुळे अनेक मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी तर शिवसेना विरुद्ध शिवसेना अशा लढती पाहायला मिळत आहेत. (Pankaja Munde On Dhananjay Munde)

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्या प्रचारसभेत भाजप नेत्या आणि विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे यांनी केलेले भाषण चर्चेत आहे. या सभेत बोलताना “धनंजय मुंडे यांनी कमळच हाती घेतलं असतं तर बरं झालं असतं”, असं विधान पंकजा मुंडे यांनी केले आहे.

पंकजा मुंडे म्हणाल्या, ” परळी विधानसभेत आपले कमळ चिन्ह नाही, तुम्ही ते शोधणार आहात हे मला माहिती आहे. म्हणूनच धनंजय मुंडेंनी कमळ घेतलं असतं तर बरं झालं असतं. आता आपल्याला धनंजय मुंडेंना आमदार करायचं आहे.

या देशात अनेक परिवार एकमेका विरुद्ध लढत आहेत. राजकारणाची पातळी अनेक जणांनी सोडली आहे. या निवडणुकीत आपण एक आहोत सर्वांना दाखवून द्यायचं आहे. सन्मानाची लढाई असते, पैशाची, सत्तेची नसते.”

त्या पुढे म्हणाल्या, ” परळीमधून २००९ ला आमदार होईल, असं माझ्या मनात कधीही नव्हतं. मी कधीच मुंडे साहेबांचा शब्द खाली टाकला नाही. आमचं घर फुटलं आणि महाराष्ट्र बघत होता. बाबा एकटे पडले म्हणून मी राजकारणात आले.

मी जीवनात काय चांगलं काम करू शकले, मला माहिती नाही. मात्र वाईट काम मी कधीच केलं नाही. मी ज्यावेळेस लोकसभेला उभी राहिली, त्यावेळी माझा भाऊ माझ्यासोबत आला आणि माझा प्रचार केला, मला खूप चांगलं वाटलं”, असेही पंकजा मुंडे यांनी सांगितले.

Total
0
Shares
Related Posts
Satish Wagh Murder Case | Satish Wagh was killed by paying a supari of 5 lakhs; Out of the five accused, 3 accused were detained by the police; Neighbor committed act due to personal dispute (Video)

Satish Wagh Murder Case | सतीश वाघ यांची हत्या 5 लाखांची सुपारी देऊन; पाच आरोपींपैकी 3 आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात; शेजारी राहणार्‍याने वैयक्तिक वादातून केले कृत्य (Video)