मुंबई : Maharashtra Assembly Election 2024 | हरियाणा विधानसभा निवडणुकीत (Haryana Assembly Election 2024) झालेल्या पराभवानंतर पुन्हा ताकतीने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने कंबर कसली आहे (Congress Maharashtra). हरियाणा मध्ये काँग्रेसच्या मतांची टक्केवारी वाढली मात्र जागा वाढल्या नाहीत. त्यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास काहीसा ढळला होता.
दरम्यान हरियाणा मध्ये झालेल्या चुका पुन्हा महाराष्ट्रात होऊ नये यासाठी काँग्रेसकडून अधिकची काळजी घेतली जात आहे. महाराष्ट्र विधानसभा जिंकण्यासाठी काँग्रेसकडून रणनीती आखण्यात आली आहे. नेत्यांनी विधानं करताना काळजी घ्यावी तसेच विधानसभेला सामोरे जाताना पक्षांतर्गत वाद दूर ठेवावेत, असे पक्ष श्रेष्ठींकडून सांगण्यात आलं आहे.
हरियाणात एका मोठ्या वर्गाला म्हणजेच जाट समूहाकडे अधिक लक्ष दिलं परंतु जाणते किंवा अजाणतेपणे इतर वर्गाकडे दुर्लक्ष केले गेले. त्यात छोट्या पक्षांनी काँग्रेसच्या विजयाची आशा धुसर केली. दरम्यान महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ जागा आहेत.
यात जातीय समीकरणही प्रदेशानुसार बदलते. हे पाहता पक्षाने महाराष्ट्रातील सपा, बसपासह स्थानिक छोट्या पक्षांच्या स्थितीचेही आकलन सुरू केले आहे. काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रातील समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष या प्रादेशिक पक्षांच्या ताकदीचा अंदाज घेणं सुरू केलं आहे.
दरम्यान हरियाणामध्ये ईव्हीएममुळे पराभव आला असा आरोप, काँग्रेसकडून केला जात आहे. पराभवाला कारणीभूत ठरलेल्या धोरणात्मक चुकाही मान्य करत आहे. पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने पक्षाच्या रणनीतीत त्रुटी असल्याचे मान्य केल आहे. नेत्यांमधील वाद हा एक मुद्दाही पराभवाचं कारण होतं. परंतु पक्ष लहान जाती गट आणि अपक्ष उमेदवारांवर लक्ष केंद्रित करण्यात अपयशी ठरल्याची माहिती एका काँग्रेस नेत्याने दिली आहे.
इतकेच नाही तर ‘इंडिया’ आघाडीतील (India Aghadi) समाजवादी पक्ष आणि आम आदमी पक्षासोबतची युतीही गांभीर्याने घेतली गेली नाही.
यादव बहुल भागात समाजवादी पक्षाच्या दीपेंद्र हुड्डा यांच्या विधानानेही पक्षाच्या मतांवर हानी पोहोचली.
त्यामुळे महाराष्ट्रातील कोणत्याही विषयावर विधाने करताना किंवा मत व्यक्त करताना सर्व राष्ट्रीय आणि
स्थानिक नेत्यांनी सावध राहण्याचा सल्ला काँग्रेस हायकमांडने दिला आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
पोलीसनामाच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/policenamaa