Maharashtra Assembly Election 2024 | ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका पुढे ढकलल्या जाणार?

Maharashtra Assembly Election 2024 | mahayuti arrange strategy for balapur constituency in state legislative assembly elections 2024
ADV

मुंबई : Maharashtra Assembly Election 2024 | राज्यात विधानसभा निवडणुकीचे वेध आता लागले आहेत. विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. सध्या अस्तित्वात असलेल्या विधानसभेचा कार्यकाळ संपण्यासाठी काहीच महिने शिल्लक आहेत. दरम्यान सर्वच पक्षांकडून आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु झालेली आहे.

दरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून (Sharad Pawar NCP) शिवस्वराज्य यात्रेचा टिझर प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेला जयंत पाटील (Jayant Patil), खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe), अनिल देशमुख (Anil Deshmukh), राजेश टोपे (Rajesh Tope) आणि सुनील भुसारा (Sunil Bhusara) हे नेते उपस्थित होते.

जयंत पाटील यांनी यावेळी बोलताना मोठा दावा केला आहे. महाराष्ट्र सरकार घाबरलं आहे. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये होणारी निवडणूक पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत असल्याचं, ते म्हणाले आहेत. त्यांच्या या दाव्यामुळे चर्चांना सुरुवात झाली आहे.

जयंत पाटील म्हणाले, ” ९ ऑगस्टला शिवनेरी किल्ल्यावरून शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेणार आहोत. त्यानंतर महाराष्ट्रात शिवस्वराज्य यात्रा-२ ही आम्ही सुरू करतोय. जुन्नर पासून यात्रा सुरू होईल. सकाळी ९ वाजता शिवनेरी किल्ल्यावर जाणार आहे. त्यानंतर यात्रा सुरू होईल.

बहुजनांचे सरकार आम्ही आणणार आहोत. त्यासाठी आम्ही जनतेकडे जाणार आहोत. लोकसभेत महायुतीला जनतेने नापसंती दिली. ३१ जागा मविआला मिळाल्या आहेत. महाराष्ट्रातून यांना आपण हद्दपार करू शकतो हे जनतेने दाखवून दिले. महाराष्ट्रात जनजागृती करण्याचे आम्ही ठरवले आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

राज्यातील कायदा सुव्यस्था कशी ढासळली आहे. बेरोजगारी कशी वाढली आहे,
हे सरकार आल्यानंतर महाराष्ट्र कसा मागे गेला आहे. हे आम्ही जनतेपर्यंत घेऊन जाणार आहोत.
सरकारचे काळे कारनामे आम्ही जनतेसमोर घेऊन जाणार आहोत,
असे म्हणत जयंत पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला.
आम्ही ज्या ठिकाणी लढणार आहोत अशा मतदारसंघात आम्ही यात्रा काढतोय “, असेही त्यांनी सांगितले.

जुन्नर. आंबेगाव, खेड-आळंदी , भोसरी, शिरूर, हडपसर, खडकवासला, दौंड, इंदापूर,
बारामती, माळशिरस, मोहोळ, सोलापूर उत्तर, माढा, करमाळा , परांडा, तुळजापूर, उदगीर,
अहमदपूर, केज, आष्टी, बीड, माजलगाव, परळी, गंगाखेड, पाथरी, जिंतूर, बसमत, घनसावंगी,
बदनापूर, भोकरदन या मतदारसंघातून शिवस्वराज्य यात्रा जाणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune MPSC Student Missing | मंत्रालयात नोकरी लागल्याचं सांगून घराबाहेर पडला; पुण्यात एमपीएससी करणारा तरुण तीन महिन्यांपासून ‘गायब’

Crocodile In Varasgaon Dam | वरसगाव धरणाच्या भिंतीवर आढळली मगर; नागरिकांना सतर्कतेचं आवाहन

SP / DCP Transfer Maharashtra | पुणे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये बदली !
विक्रांत देशमुख यांची महामार्ग सुरक्षा पथकाच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती, गडचिरोली एसआरपीएफचे विवेक मासाळ पुण्यात DCP

Total
0
Shares
Related Posts