मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Maharashtra Assembly Election 2024 | छत्रपती संभाजीराजे (Sambhaji Raje Chhatrapati ) आणि राजरत्न आंबेडकर (Rajratna Ambedkar) यांची पत्रकार परिषद मुंबईत पार पडली. महायुती (Mahayuti), महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) वगळता आणखी नवा पर्याय देण्याचे भाष्य यावेळी करण्यात आले. महायुती आणि महाविकास आघाडी हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. महाराष्ट्राच्या जनतेला पर्याय म्हणून आम्ही पुढे येत आहोत. सामान्य व्यक्तीला त्यांच्या हक्काचं बटण देण्याचं काम आम्ही करणार आहोत.(Maharashtra Assembly Election 2024)
लोकसभेत जनतेने जो निर्णय दिला त्यावर विधानसभेत पुढे जाऊ असे कुणाला वाटत असेल तर ते साफ चुकीचे आहे. महाराष्ट्रात नवीन समीकरण उदयास आलं आहे. छत्रपती संभाजीराजे आणि राजरत्न आंबेडकर यांच्यासोबत इतर संघटना लवकरच नवा पर्याय देत निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची घोषणा संभाजीराजेंनी केली आहे.
संभाजीराजे म्हणाले, महाराष्ट्र खऱ्या अर्थाने आता सुसंस्कृत राहिलाय का हे आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. या ७५ वर्षात नुसते हेवेदावे सुरू आहेत. महाराष्ट्र कसा घडवू शकतो?, महाराष्ट्र इतरांना दिशा देण्याचे काम करतो. सध्या लोकं अस्वस्थ आहेत. लोकसभेत जनतेने जो निर्णय दिला त्यावर विधानसभेत पुढे जाऊ असे कुणाला वाटत असेल तर ते साफ चुकीचे आहे.
मागील १५-२० दिवसात जनतेच्या व्यथा समजल्यानंतर आम्ही एक वेगळा पर्याय, ज्यातून सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्याच्या दिशेने आमचा प्रवास सुरू झाला आहे असे त्यांनी सांगितले. बच्चू कडू, राजू शेट्टी, मनोज जरांगे -पाटील आणि ओबीसी नेत्यांशी आमची चर्चा सुरु असल्याचेही त्यांनी म्हंटले
समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन चांगला पर्याय महाराष्ट्रासमोर देणार आहोत. जरांगे पाटील सध्या सगळ्यांचा अंदाज घेत आहेत. ते सकारात्मक निर्णय घेतील. महायुती, महाविकास आघाडी यांना पर्याय म्हणून आम्ही नवा पर्याय लोकांसमोर देणार आहोत, असे संभाजीराजेंनी सांगितले.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
पोलीसनामाच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/policenamaa
हे देखील वाचा