दिंडोरी : Maharashtra Assembly Election 2024 | ‘शरद पवार’ या सहा शब्दांभोवती महाराष्ट्राचे राजकारण (Maharashtra Politics) कितीतरी वर्षे फिरत आहे. अनेकदा शरद पवारांचं (Sharad Pawar NCP) राजकारण सहसा कोणाच्या ध्यानात येत नाही. महाविकास आघाडीचं सरकार (Mahavikas Aghadi Govt) स्थापन झाल्यानंतर अनेक राजकीय विश्लेषकांनीही भुवया उंचावल्याचं पाहायला मिळालं. (MVA Govt)
दरम्यान आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या दिंडोरी येथे (Dindori Assembly Constituency) शिवस्वराज्य यात्रेचे (Shivswaraj Yatra) आगमन होत आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe), ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे (Shriram Shete), युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख (Mehboob Shaikh) आदींच्या उपस्थितीत संस्कृती लॉन्स येथे सकाळी १० वाजता यात्रेचे सभेत रुपांतर होणार आहे.
दरम्यान मतदारसंघातील इच्छुकांनी शक्ती प्रदर्शनाची जोरदार तयारी केली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी कडून दिंडोरी- पेठ विधानसभेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षासाठी निश्चित असून शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून प्रचाराचा शुभारंभच होणार आहे.
पक्षाकडून उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्याही मोठी आहे. शिवसेना उबाठा गटात (Shivsena Thackeray Group) असलले माजी आमदार रामदास चारोस्कर (Ramdas Charoskar ) यांच्या पत्नी, माजी जि.प समाजकल्याण सभापती सुनीता चारोस्कर (Sunita Charoskar ) उद्या शिवस्वराज्य यात्रेत समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात शक्तिप्रदर्शन करीत प्रवेश करणार आहेत. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांचे पुत्र गोकूळ झिरवळ (Gokul Zirwal) उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.
वणीचे २० वर्षांपासून तसेच विद्यमान लोकनियुक्त सरपंच मधुकर भरसट, आदिवासी बचाव अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राचार्य अशोक बागूल, पक्षाचे युवा नेते संतोष रेहरे, माजी जिल्हा परिषद सदस्या सुशीला चारोस्कर, माजी आमदार भगवंत गायकवाड यांचे नातू स्वप्नील गायकवाड इच्छुक आहेत. सर्व इच्छुकांचा प्रचार सुरु असून उद्या शक्तीप्रदर्शनही करणार आहेत.(Maharashtra Assembly Election 2024)
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
पोलीसनामाच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/policenamaa
हे देखील वाचा