सातारा: Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. लोकसभेला महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठे यश मिळाले. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे १० पैकी ८ खासदार निवडून आले. दरम्यान, विधानसभा निवडणूक तुतारी (Tutari) चिन्हावर लढण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. त्यामुळे शरद पवारांच्या पक्षात (Sharad Pawar NCP) मोठी इन्कमिंग सुरु आहे.
दरम्यान, आता फलटणचे संजीवराजे नाईक निंबाळकर (Sanjeevraje Naik Nimbalkar), आमदार दीपक चव्हाण (MLA Deepak Chavan) हे शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत तर स्वतः रामराजे निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) मात्र कोणाचाही प्रचार करणार नसल्याचे निश्चित झाले आहे.
विधानसभा निवडणुकांआधी फलटणच्या राजकारणात मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वीच रामराजे नाईक निंबाळकर यांनी तुतारी हाती घेणार असल्याचे संकेत दिले होते. अखेर याबाबतचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. (Phaltan Assembly Constituency)
“गेल्या दीड वर्षात ज्या पद्धतीने या जिल्ह्यातील विशेष करून माण, फलटण खटाव या तालुक्यातून सत्ता राबवली गेली. त्यामुळे कार्यकर्त्यांना भ्रम होता की सत्तेत जाऊन, महायुतीत जाऊन आपल्याला काय मिळालं त्यामुळे त्याचा हा परिणाम आहे. कार्यकर्त्यांना भोगावे लागत आहे. किती वेळा सांगितलं तरी त्यात काही फरक पडत नाही वरून फोन आले आहेत वरिष्ठांचे फोन आले आहेत असे सांगितले जाते.
गेल्या दीड वर्षात फक्त मीच टार्गेट झालो आहे. आमचं भारतीय जनता पार्टीच्या (BJP) विचारसरणीशी भांडण नाही. आम्हाला आमच्या स्थानिक राजकारणा पलीकडे कशाशी देणंघेणं नाही”, असे रामराजे नाईक निंबाळकर यांनी म्हंटले आहे.(Maharashtra Assembly Election 2024)
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
पोलीसनामाच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/policenamaa
Pune Crime News | पूर्ववैमनस्यातून तरुणावर तलवारीने वार करुन खुनाचा प्रयत्न
Ajit Pawar NCP | आणखी दोन बडे नेते अजित पवारांची साथ सोडणार; तुतारी फुंकण्याचा घेतला निर्णय