मुंबई : Maharashtra Assembly Election 2024 | लोकसभा निवडणुकीत राज्यात मविआला (Mahavikas Aghadi) चांगले यश मिळाले तर महायुतीला (Mahayuti) फटका बसला. लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी सर्वच पक्षांकडून सुरु झालेली आहे. दरम्यान मविआने या निवडणुकीसाठी पूर्ण ताकद लावण्याचे ठरवले आहे.
मात्र जागावाटपाचा तिढा सोडवताना मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार? याबाबत चर्चा सुरु असतानाच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी याबाबत भाष्य केले आहे. उद्धव ठाकरे हे तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत.
उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दिल्लीत इंडिया आघाडीच्या (India Aghadi) प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) व राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याशी उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीतील जागावाटप आणि रणनीतीबाबत चर्चा केल्याची माहिती आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला (Ramesh Chennithala) यांची देखील भेट घेतली आहे. यामुळे महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
काल झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले , महाराष्ट्राला लुटणाऱ्या महायुतीचा पराभव करणे हाच प्रमुख उद्देश आहे. मुख्यमंत्री पदाचा निर्णय कधीही घेता येईल. मुख्यमंत्री असताना मी चांगले काम केले असेल तर महाविकास आघाडीतील माझ्या सहकाऱ्यांनीच मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारीबाबत निर्णय घ्यावा, असे त्यांनी म्हंटल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आता उद्धव ठाकरेंच्या गाठीभेटीनंतर आता तेच महाविकास आघाडीचा चेहरा असणार का? याबाबत चर्चा सुरु आहेत. (Maharashtra Assembly Election 2024)
“उद्धव ठाकरे हे पहिले आम्हाला चिडवायचे की, तुम्हाला दिल्ली दरबारी जाऊन निर्णय करावे लागतात.
आज त्यांच्यावर देखील हीच परिस्थिती आली आहे. तीन दिवस दिल्लीत जावे लागले आहे.
अपॉइंटमेंट घेऊन मुख्यमंत्रिपदासाठी याचना करावी लागते.
तरी इतर दोन मित्र हे सांगायला तयार नाहीत की तेच मुख्यमंत्री असतील. मला त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटते”,
असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
पोलीसनामाच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/policenamaa
हे देखील वाचा