नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन – Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) मोठे इन्कमिंग सुरु आहे. लोकसभेला महाविकास आघाडीला मोठे यश मिळाल्याने महायुतीचे अनेक नेते मविआ ची वाट धरताना दिसत आहेत. मात्र या इन्कमिंगमुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार आहे.
दरम्यान महाविकास आघाडीतील नेत्यांना डावलून आयात उमेदवार दिल्यास बंडखोरीचा इशारा देण्यात आला आहे. देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघ (Deglur Assembly Constituency) हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. पण, येथून इच्छुक उमेदवारांना डावलून महाविकास आघाडीने भाजप व इतर पक्षांतील आयात उमेदवाराला उमेदवारी दिल्यास राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे (Sharad Pawar NCP) इच्छुक उमेदवार जिल्हा उपाध्यक्ष तथा तालुकाध्यक्ष सुभाष गायकवाड (Subhas Gaikwad) यांनी बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढण्याचा इशारा दिला आहे.
मतदारसंघात मविआ कडून अनेक जुने जाणते, निष्ठावंत, अभ्यासू कार्यकर्त्यांनी आपापल्या पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. पण, अशा निष्ठावान कार्यकर्त्यांना महाविकास आघाडीने डावलून भाजप व इतर पक्षातील आयात उमेदवाराला उमेदवारी दिल्यास महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शरद पवार गटाच्या सुभाष गायकवाड यांनी बंडखोरीचे संकेत दिले आहेत.
या मतदारसंघातून महायुती (Mahayuti), महाविकास आघाडी आदी पक्षांकडून अनेक इच्छुक उमेदवार रिंगणात आहेत. असे असले तरी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या मतदारसंघाचे विद्यमान आमदार जितेश अंतापूरकर यांनी काँग्रेस पक्षामधून भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे भाजपकडून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
दरम्यान भाजपकडून इच्छुक असलेल्या एका माजी आमदाराची कोंडी निर्माण झाली आहे. ते मविआ कडून उमेदवारासाठी मुंबई दौरे करीत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता आहे.(Maharashtra Assembly Election 2024)
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
पोलीसनामाच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/policenamaa