‘या’ महिला बंडखोर आमदाराची शिवसेनेतून ‘हकालपट्टी’ !

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीचा प्रचार सध्या जोरात सुरु असून सर्वच पक्षांनी प्रचारात आघाडी घेतली असून अनेक ठिकाणी काही उमेदवारांनी बंडखोरी केली आहे. या बंडखोरीमुळे शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा वाद उफाळून आल्यानंतर भाजपने अनेक बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी केली होती. त्यानंतर आता शिवसेनेने देखील बंडखोर उमेदवारांची हकालपट्टी करण्यास सुरुवात केली असून आता बंडखोर तृप्ती सावंत यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

BREAKING: बंडखोर तृप्ती सावंत यांची शिवसेनेतून हकालपट्टी

वांद्रे विधानसभा मतदारसंघातील आमदार असलेल्या तृप्ती सावंत यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र यामुळे आता त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. यांची माहिती शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून देणार आली असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार हि कारवाई करण्यात आली आहे. वांद्रे पूर्वमधून तृप्ती सावंत यांना उमेदवारी नाकारून महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना देण्यात आल्याने त्यांनी याठिकाणी बंडखोरी केली होती. तृप्ती सावंत या दिवंगत बाळा सावंत यांच्या पत्नी असून त्या सध्या या मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत.

दरम्यान, तृप्ती सावंत यांनी 2015 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये माजी काँग्रेस नेते नारायण राणे यांचा पराभव केला होता. मात्र यावेळी त्यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने त्या नाराज झाल्या होत्या.

Visit : Policenama.com 

शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या