विधानसभा 2019 : राज्यातील ‘हे’ 6 विभाग, प्रत्येक ठिकाणी वेगळा मुद्दा आणि राजकीय पक्षांची दावेदारी, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार सध्या जोरात सुरु असून कलम 370 आणि राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर पुन्हा एका भाजप सत्ता मागत आहे. मात्र वेगवेगळ्या विभागातील प्रश्न वेगवेगळे असून उत्तर महाराष्ट्रात कृषी संकट आणि कांद्याचे पडणारे भाव हा प्रश्न असून विदर्भात शेतकरी आत्महत्या हा मोठा मुद्दा आहे. तर मराठवाड्यात मोठया प्रमाणात पाण्याची समस्या असून कोकण आणि मुंबईमध्ये आर्थिक मंदी आणि पीएमसी बँक घोटाळा हा प्रचाराचा मुख्य मुद्दा आणि समस्या आहे.

उत्तर महाराष्ट्रातील राजकीय समीकरण
उत्तर महाराष्ट्रात विधानसभेच्या 35 जागा असून एकेकाळी हा विभाग काँग्रेसचा किल्ला होता, मात्र मागील निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने या ठिकाणी विजय मिळवत आपली पकड घट्ट केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन हे उत्तर महाराष्ट्र संपूर्णपणे जिंकणे असल्याच्या दावा करत आहेत. जळगावमधून एकनाथ खडसे हा भाजपचा मोठा चेहरा असून राष्ट्रवादी काँग्रेसकडे छगन भुजबळ यांच्या रूपाने मोठा चेहरा आहे. 2014 च्या निवडणुकीत या विभागात भाजपला 14, शिवसेनेला 7, काँग्रेसला 7, राष्ट्रवादी काँग्रेसला 5 तर अन्य जणांना 2 जागा मिळाल्या होत्या.

विदर्भ : फडणवीस यांचे होमग्राउंड
विदर्भ देखील काँग्रेसचा किल्ला मानला जातो. इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादल्यानंतर देखील येथील लोकांनी त्यांची साथ सोडली नव्हती. भाजपाला या ठिकाणी पाय रोवण्यास बरेच कष्ट घ्यावे लागले होते. त्यामुळे येथील 62 पैकी 44 जागांवर भाजपला विजय मिळाला होता. तर शिवसेनेला 4, काँग्रेसला 10 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागा जिंकण्यात यश आले होते.

मागील काही वर्षणापासून विदर्भ या वेगळ्या राज्याची मागणी होत असून शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि अपूर्ण सिंचन योजना येथील प्रमुख समस्या आहेत. दुष्काळ आणि कमी उत्पादनामुळे गेली अनेक वर्ष येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस नागपूरमधील दक्षिण पश्चिम जागेवरून निवडणूक लढवत असून काँग्रेसचा या भागातील चेहरा असलेले नाना पटोले साकोली मधून निवडणूक लढवत आहेत.

मराठवाडा : मोठ्या नेत्यांचे घर
महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणत दुष्काळी भाग असलेला हा भाग कायम चर्चेत असतो. मात्र मागील काही दिवसांपासून येथे चांगला पाऊस पडत आहे. 2016 मध्ये पडलेल्या दुष्काळात लातूरमध्ये रेल्वेमधून पाणी पुरवण्यात आले होते. या भागात मराठ्यांसह मुस्लिमांची संख्या देखील मोठी असून हे मतदार महत्वाची भूमिका बजावणार आहेत.

पाण्याची कमी आणि रोजगार हा येथील महत्वाचा मुद्दा असून येथील मोठा भाग हा शेतीवर अवलंबून आहे. 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत 46 पैकी भाजप 15, शिवसेना 11, काँग्रेस 9 आणि राष्ट्रवादी काँग्रेसने 8 जागांवर विजय मिळवला होता. मराठवाड्यातून नांदेडमधून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण तर लातूरमधून दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित आणि धीरज रिंगणात आहेत.

पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला हरवण्याचा भाजपचा प्रयत्न
साखरेचा आणि उसाचा पट्टा म्हणून पश्चिम महाराष्ट्राची ओळख आहे. साखर कारखान्यांच्या माध्यमातून राजकारण करणाऱ्या नेत्यांचे या ठिकाणी खूप मोठे जाळे आहे. मागील लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने जिंकलेल्या चारही जागा या पश्चिम महाराष्ट्रातील होत्या. 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत येथील 71 जागांपैकी भाजपने 24, शिवसेना 13, कांग्रेस 10, राष्ट्रवादी काँग्रेसने 19 आणि अन्य जणांनी 4 जागांवर विजय मिळवला होता.

या भागात राष्ट्रवादीचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी भाजपने अनेक राष्ट्रवादीच्या नेत्यांना आपल्या पक्षात घेतले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशील कुमार शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात देखील याच भागातून येतात. सांगली आणि कोल्हापूर आलेल्या पुरामुळे नागरिकांचे झालेले मोठे नुकसान हा या प्रमुख मुद्दा असून आर्थिक मंदी हादेखील महत्वाचा प्रचार मुद्दा आहे.

कोकण :रिफायनरी महत्वाचा मुद्दा
या विभागात विधानसभेच्या 39 जागा येतात. रायगढ़ आणि रात्नागीसारख्या मोठ्या शहरांचा या विभागात समावेश होतो. नाणार रिफायनरी हा येथील महत्वाचा प्रचाराचा मुद्दा असून शिवसेना आणि भाजप याठिकाणी या मुद्द्यावरून बॅकफूटवर गेलेली आढळून येत आहे. या ठिकाणी नारायण राणे हे भाजपचा चेहरा असून मागील निवडणुकीत 39 पैकी भाजप 10 शिवसेनेने 15, काँग्रेस 1 , राष्ट्रवादीने 8 आणि अन्य 6 जणांनी या ठिकाणी विजय मिळवला होता.

मुंबई : पीएमसी बँक आणि आरे कॉलनी मुख्य मुद्दा
मुंबई विभागात विधानसभेच्या 36 जागा येत असून या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने महायुतीला पराभूत करण्यासाठी मोठा जोर लावला आहे. पीएमसी बँक घोटाळा, पायाभूत सुविधा, आरे कॉलनी येथील प्रचाराचे प्रमुख मुद्दे असून शिवसेनेचे आदित्य ठाकरे देखील यावेळी विधानसभेच्या रिंगणात आहेत. मुमबी शहरात शिवसेना यावेळी भाजपपेक्षा जास्त जागांवर निवडणूक लढत आहेत. 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजप 15, शिवसेना 14१४ काँग्रेस 5 आणि अन्य 2 जणांनी या ठिकाणी विजय मिळवला होता.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी