Exit Poll : मुंबई आणि कोकणाचा ‘किंग’ कोण ?, मतदार ‘राजा’नं दिलं एकाच सुरात उत्तर, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात सोमवारी 288 जागांसाठी विधानसभेचे मतदान पार पडले आणि त्यानंतर लगेच एग्जिट पोल यायला सुरुवात झाली. ज्यानुसार पुन्हा एकदा राज्यात फडणवीस सरकार स्थापन होणार हे आता निश्चित झाले आहे. मात्र बहुचर्चित असलेल्या कोकण भागात आणि आरे वरून वातावरण तापलेल्या मुंबई भागात यावेळी सेना भाजपला किती यश मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

मुंबईतील 36 पैकी 30 जागा युतीला
महाराष्ट्रात सेना भाजप युती असल्यामुळे मुबंईत 36 पैकी 30 जागा या युतीला मिळणार असल्याचे एग्जिट पोलचे आकडे सांगतात. त्यातच विरोधात असलेल्या आघाडीला केवळ तीन जागा या ठिकाणाहून मिळणार आहेत. तर अपक्षांना मुंबईमध्ये तीन जागा मिळणार आहेत.

कोकण – ठाण्यात युतीला 29 तर आघाडीला 6 जागांवर विजय
कोकण आणि ठाण्यामध्ये युती विरुद्ध आघाडी यामध्ये प्रचारादरम्यान चांगलीच चकमक पहायला मिळाली. या भागात एकूण 39 जागा आहेत. एग्जिट पोलच्या निकषानुसार सत्ताधारी युतीला 29 आणि विरोधातील आघाडीला केवळ 6 जागांवर विजय मिळवता येणार आहे. तर चार ठिकाणी अपक्ष उमेदवार निवडून येणार आहेत.

2014 मध्ये काय होती आकडेवारी
मागील विधानसभेमध्ये या क्षेत्रातून भाजप आणि शिवसेनेला मोठ्या प्रमाणावर यश मिळाले होते. मुंबईमधून भाजपला 15 तर शिवसेनेला 14 जागांवर विजय मिळाला होता. तर काँग्रेसला पाच जगावर समाधान मानावे लागले होते विशेष म्हणजे राष्ट्रवादीला या ठिकाणाहून एकही जागा मिळवता आली नव्हती. कोकण ठाणे भागातून शिवसेनेला 14 तर भाजपला 10 जागा मिळाल्या होत्या. राष्ट्रवादीला आठ तर काँग्रेसला अवघ्या एक जागेवर समाधान मानावे लागले होते. तर सहा जागांवरून अपक्ष उमेदवार निवडून आले होते.

 

Visit : Policenama.com