राज्यात सायं. 6 वाजे पर्यंत 55.56 % मतदान, 2009 चे रेकॉर्ड मोडणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आरोप प्रत्यारोप झाले. सत्ताधारी भाजप आणि शिवसेना महायुती आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या महाआघाडीने निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचार केला. आज राज्यात 288 जागांसाठी मतदान प्रक्रीया पार पडली. सर्वच पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मतदारांना मतदानासाठी मतदान करण्याचे आवाहन करत त्यांना मतदान केंद्रावर घेऊन जाताना दिसत होते. मात्र, मतदानाची टक्केवारी वाढलेली दिसून आली नाही.

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार सायंकाळी सहापर्यंत 55.96 टक्के मतदान झाले. तर पाच वाजेपर्यंत 50 टक्के मतदान झाले. शेवटच्या एका तासात मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी करुन रांगा लावत मतदान केले. त्यामुळे मतदानाची वेळ संपेपर्यंत 55.90 टक्के मतदान झाले. ठराविक मतदान केंद्र वगळता इतर सर्वत्र शेवटच्या तासात मतदानासाठी रांगा लागल्या होत्या.

2009 मध्ये 59.6 टक्के मतदान
महाराष्ट्रात 2000 नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या टक्केवारी पाहिली तर, 2009 मध्ये 59.6 टक्के मतदान झाले होते. तर 2014 मध्ये 60.32 टक्के मतदान झाले होते. 2004 ते 2014 दरम्यान झालेल्या मतदानामध्ये सर्वात कमी मतदान 2009 मध्ये झाले होते. यावेळी पाच वाजेपर्यंत झालेल्या मतदानाच्या आकडेवारी पाहता यंदा 2009 च्या मतदान टक्केवारीचे रेकॉर्ड मोडू शकते.

Visit  :Policenama.com

You might also like