राज्यातील ‘या’ 35 मतदारसंघात बिग ‘फाईट’, ‘इथं’ भाजप व राष्ट्रवादीला ‘झटका’ बसू शकत असल्यानं वातावरण ‘टाईट’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – एक्झिट पोलची आकडेवारी जाहीर झाली आहे, विधानसभा निवडणूकीचे आधिकृत निकाल 24 तारखेला जाहीर होतील. परंतू एक्झिट पोलमध्ये भाजपने बाजी मारल्याचे चित्र आहे. पोल डायरी संस्थेच्या सर्व्हेनुसार भाजपला 121 – 128 जागा मिळतील तर शिवसेनेला 55 – 64 जागा मिळतील, काँग्रेसला 39 – 46 जागा मिळतील तर राष्ट्रवादीला 35 – 42 जागा, वंचितला 1 – 4 जागा, मनसेला 1 – 5 जागा मिळतील असा अंदाज आहे. परंतू राज्यातील 35 असे मतदारसंघ आहेत ज्यात काटे की टक्कर होणार आहे. ज्या महायुती आणि महाआघाडीत अटीतटीची लढत असेल.

1. परळी – पंकजा मुंडे (भाजप) विरुद्ध धनंजय मुंडे (राष्ट्रवादी)
2. नागपूर दक्षिण पश्चिम – देवेंद्र फडणवीस (भाजप) विरुद्ध आशिष देशमुख (काँग्रेस)
3. दक्षिण कराड – पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस) विरुद्ध अतुल भोसले (भाजप)
4. बीड – जयदत्त क्षीरसागर(शिवसेना), संदीप क्षीरसागर(राष्ट्रवादी), अशोक हिंगे (वंचित ब. आघाडी)
5. कोथरूड – चंद्रकांत पाटील (भाजप) विरुद्ध किशोर शिंदे (मनसे)
6. येवला – छगन भुजबळ (राष्ट्रवादी) विरुद्ध संभाजी पवार (शिवसेना)
7. अहेरी – अंबरिशराजे आत्राम(भाजप), दिपक आत्राम(काँग्रेस), धर्मबाबा आत्राम (राष्ट्रवादी)
8. वरळी – आदित्य ठाकरे (शिवसेना) विरुद्ध सुरेश माने (राष्ट्रवादी)
9. कर्जत जामखेड – रोहित पवार (राष्ट्रवादी) विरुद्ध राम शिंदे (भाजप)
10. नालासोपारा – प्रदीप शर्मा (शिवसेना) विरुद्ध क्षितिज ठाकूर (बहुजन विकास आघाडी)
11. कणकवली – नितेश राणे (भाजप) विरुद्ध सतीश सावंत (शिवसेना)
12. सिल्लोड – अब्दुल सत्तार(शिवसेना), कैसर आझाद शेख (काँग्रेस), प्रभाकर पालोडकर(अपक्ष)
13. औरंगाबाद पश्चिम – संजय शिरसाट(शिवसेना), संदीप शिरसाट (वंचित बहुजन आघाडी)
14. नाशिक पूर्व – बाळासाहेब सानप (राष्ट्रवादी), राहुल ढिकले (भाजपा), गणेश उन्हावणे (काँग्रेस)
15. करमाळा – रश्मी बागल (शिवसेना), संजय पाटील (राष्ट्रवादी), नारायण पाटील (अपक्ष)
16. कराड दक्षिण – पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस), अतुल भोसले (भाजपा), उदयसिंह उंडाळकर(अपक्ष)
17. कणकवली – नितेश राणे(भाजप), सुशील राणे(काँग्रेस), सतीश सावंत(शिवसेना)
18. हातकणंगले – सुजित मिणचेकर(शिवसेना), राजु आवळे(काँग्रेस)
19. शिरोळ – उल्हास पाटील(शिवसेना), राजेंद्र पाटील(अपक्ष)
20. विक्रमगड – हेमंत सावरा (भाजप) सुनील भुसरा (राष्ट्रवादी), संतोष वाघ (वंचित बहुजन आघाडी)
21. शहापूर – पांडुरंग बरोरा (शिवसेना), दौलत दरोडा (राष्ट्रवादी) हरिषचंद्र खंडवी (वंचित ब.आघाडी)
22. कल्याण पश्चिम – विश्वनाथ भोईर (शिवसेना), प्रकाश भोईर (मनसे), नरेंद्र पवार (अपक्ष)
23. वांद्रे पूर्व – विश्वनाथ महाडेश्वर (शिवसेना), तृप्ती सावंत (अपक्ष), जीशान सिद्दीकी (काँग्रेस)
24. खेड-आळंदी – सुरेश गोरे (शिवसेना), दिलीप मोहिते (राष्ट्रवादी), हिरामण कांबळे (वंचित आघाडी)
25. पुणे कॅन्टोन्मेंट – सुनील कांबळे (भाजप), रमेश बागवे (काँग्रेस), मनिषा सरोदे (मनसे)
26. बारामती – अजित पवार (राष्ट्रवादी) विरुद्ध गोपीचंद पडळकर (भाजप)
27. धुळे शहर – अनिल गोटे (लोकसंग्राम), हिलाल माळी (शिवसेना), राजवर्धन कदमबांडे (अपक्ष)
28. भुसावळ – संजय सावकरे (भाजप), जगन सोनावणे (राष्ट्रवादी)
29. बडनेरा – रवी राणा (अपक्ष),  प्रीती बंड(शिवसेना)
30. रामटेक – मल्लिकार्जन रेड्डी(भाजप), उदयसिंग यादव(काँग्रेस), आशिष जयस्वाल(अपक्ष)
31. नांदेड दक्षिण – राजश्री पाटील(शिवसेना), मोहन हंबार्डे(काँग्रेस)
32. लोहा – मुक्तेश्वर धोंडगे (शिवसेना), दिलीप धोंडगे (राष्ट्रवादी)
33. बसमत – जयप्रकाश मुंदडा (शिवसेना), चंद्रकांत नवघरे (राष्ट्रवादी)
34. गंगाखेड – विशाल कदम(शिवसेना), मधुसुदन केंद्रे (राष्ट्रवादी), रत्ताकर गुट्टे (रासपा)
35. पाथरी – मोहन फड (भाजप), सुरेश वरपुडकर(काँग्रेस), जगदिश शिंदे(अपक्ष)

सर्व्हेनुसार कर्जत जामखेड मतदारसंघात भाजपचे रामशिंदे विरुद्ध राष्ट्रवादीचे रोहित पवार यांच्या अटीतटीचा सामना होईल परंतू यात रोहित पवार बाजी मारतील अशी शक्यता आहे. याशिवाय इंदापूरमधून भाजपचे हर्षवर्धन पाटील विजयी होतील अशी शक्यता आहे. नालासोपाऱ्यातून देखील बहुजन विकास आघाडीचे क्षितीज ठाकूर यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रदीप शर्मा याचा पराभव होऊ शकतो. लातूरमधून देखील विलासराव देशमुख याचे दोन्ही मुलं विजयी होतील अशी शक्यता आहे.

साकोली मतदारसंघात भाजपचे परिणय फुके यांचा पराभव करुन नाना पटोले विधानसभेत निवडून येतील असा अंदाज आहे. तर जालन्यातून शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांनाही पराभवाचा धक्का बसू शकतो. पुसदमधून राष्ट्रवादीचे निलय नाईक यांचा पराभव होऊ शकतो. यामध्ये यवतमाळ-वणी येथील एक जागा मनसेचे राजू उंबरकर हे निवडून येतील असा अंदाज आहे. त्याचसोबत विदर्भातील कामठी, नागपूर उत्तर येथे काँग्रेस निवडून येण्याची शक्यता आहे.

परतूरमधून बबनराव लोणीकर यांना पराभव होऊ शकतो तर धारावीत वर्षा गायकवाड यांना देखील पराभवाचा सामना करावा लागू शकतो. बाळापूरमध्ये वंचित बहुजन आघाडीला विजय मिळेल अशी शक्यता आहे. परांडातून शिवसेनेचा तानाजी सावंत यांचा पराभव होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर दक्षिणमधून भाजपच्या उमेदवाराचा पराभव करत काँग्रेसचे ऋतुराज पाटील निवडून येऊ शकतात.

Visit : Policenama.com

 

Loading...
You might also like