Maharashtra Assembly Elections 2024 | ‘महाराष्ट्रात पुढची मुख्यमंत्री महिला…’; पवारांच्या कुटुंबातून मोठी अपडेट

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Maharashtra Assembly Elections 2024 | लोकसभा निवडणुकीच्या (Pune Lok Sabha) निकालानंतर राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला एकप्रकारे सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत शरद पवारांनी विविध भागात दौरे सुरु केले आहेत. लोकसभेच्या निकालाने राज्यात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) बळ वाढले आहे. चार महिन्यात विधानसभा निवडणुका होणार असल्याचे बोलले जात आहे.(Maharashtra Assembly Elections 2024)

दरम्यान आमदार रोहित पवारांनी पुढच्या मुख्यमंत्र्यांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. आज मुख्यमंत्री कोण होणार, हे सांगू शकत नाही पण एखादी महिला मुख्यमंत्री होऊ शकते, असं रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले आहेत. रोहित पवारच्या या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत.

आपल्यात आणि जयंत पाटील यांच्यात कोणताही वाद नसल्याचं स्पष्टीकरणही रोहित पवारांनी दिलं आहे. जयंत पाटील आणि माझ्यात वाद कुठे आहे? मीडियाने वेगळा अर्थ काढला. जयंत पाटील (Jayant Patil) सीनियर आहेत त्यामुळे चांगलं काम करू शकतात. कुठलं पद कुणाला द्यायचं हे साहेब ठरवतील, असं रोहित पवार म्हणाले.

तसंच पक्षात कुणाला घ्यायचं, कुणाला नाही हे साहेब ठरवतील. आम्ही फक्त विनंती करू शकतो. परत घेताना कुठल्याही कार्यकर्त्यावर अन्याय झाला नाही पाहिजे, असं विधान रोहित पवारांनी केलं.

तसेच रोहित पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवरही टिप्पणी केली आहे. पवार म्हणाले, ” त्यांच्या पक्षातील लोकं अस्वस्थ आहेत. त्यांच्यासोबत असलेले आमदार ब्रम्हदेव आला तरी त्यांच्यासोबत राहणार नाहीत, त्यामुळेच त्यांनी सुनेत्रा काकींना राज्यसभेची उमेदवारी दिली, असा दावा रोहित पवारांनी केला आहे.

‘माझ्या काकी म्हणून त्यांचे अभिनंदन करतो, त्या खासदार झाल्या आहेत. अजित पवारांनी आधी सांगितलं की राज्यमंत्रीपद आम्हाला शोभणार नाही, काकींना राज्यमंत्रीपद दिलं तर अजित पवारांना स्पष्टीकरण द्यावं लागेल. त्यांच्या पक्षात काय सुरू आहे, हे अजित पवारांना माहिती आहे, म्हणून त्यांनी काकींना खासदारकी दिली’, असं रोहित पवार म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aundh Pune Crime News | पुणे : पहाटेच्या सुमारास दरोड्याच्या उद्देशाने तिघांना रॉडने बेदम मारहाण, दोघांची प्रकृती चिंताजनक; औंध परिसरातील घटना

PM Kisan Samman Nidhi | तारीख ठरली! पुढील आठवड्यात ‘या’ दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात येतील पैसे