तिकीट नाही मिळालं म्हणून अवघ्या 1 महिन्यात ‘या’ नेत्याची शिवसेनेतून राष्ट्रवादीत ‘घरवापसी’

पुसद : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपतर्फे उमेदवारांची  यादी  जाहीर करण्यात आली. यामध्ये नाराज झालेल्या नेत्यांनी बंडाचा झेंडा फडकवला आहे.  गेल्याच महिन्यात पुसदचे राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते मनोहरराव नाईक यांचे चिरंजीव इंद्रनील यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळणार नसल्याने त्यांनी राष्ट्रवादीत पुनर्प्रवेश केला आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत मनोहरराव नाईक राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुसद मतदारसंघातून निवडून आले होते. ते राष्ट्रवादीचे विदर्भातील एकमेव आमदार होते. त्यांनी आपल्या दोन्ही मुलांसह शिवसेनेत प्रवेश केला होता. भाजपकडून मुलाला तिकीट  मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र भाजपाने पुसद मतदार संघातून विधान परिषदेचे आमदार निलय नाईक यांना उमेदवारी दिली आहे.  मनोहरराव नाईक यांनी केवळ तिकिटासाठी घरवापसी केली आहे. त्यामुळे या मतदारसंघात आता दोन सख्खे चुलत भाऊ आमने सामने उभे ठाकले आहेत.

पुसदमध्ये नाईक घराण्याची एकहाती सत्ता राहिली आहे. पुसदने आतापर्यंत वसंतराव नाईक व सुधाकरराव नाईक यांच्या रुपाने राज्याला दोन मुख्यमंत्री दिले आहेत. मनोहरराव नाईक हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांची बंधू आहेत.

Visit : Policenama.com

तुमच्या मुलांच्या डोळ्यांची अशी घ्या काळजी, उपाय जाणून घ्या
जाणून घ्या ‘सेक्शुअल लाइफ’ असंतुष्ट असण्याची कारणे, अशी घ्या काळजी
चिंच आहे बहुगुणी, उन्हाचा कडाका वाढला तर आवश्य खा

शरीरात ‘या’ ठिकाणी लपतो ‘एड्स’चा व्हायरस, संशोधकांनी केला दावा
मधुमेहाचे औषध स्तनाच्या कॅन्सरवर उपयुक्त, चिनी संशोधकांचे मत
मुलांना कोणत्या वयात शाळेत घालावे? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
ऑफिसमध्ये जेवण करताना घ्यावी ‘ही’ काळजी, तुमच्यासाठी ठरु शकते फायदेशीर
नाभीवर लावा २ थेंब दारु, दूर होतील पीरियड्ससंबंधीत ‘या’ समस्या, जाणून घ्या