×
Homeताज्या बातम्याMaharashtra Assembly Session | 'महाराष्ट्राचे प पू' म्हणणाऱ्या शिंदे गटाला आदित्य ठाकरेंचं...

Maharashtra Assembly Session | ‘महाराष्ट्राचे प पू’ म्हणणाऱ्या शिंदे गटाला आदित्य ठाकरेंचं जाहीर आव्हान, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Assembly Session | राज्याच्या विधानभवनाच्या पायऱ्यांवर आज शिंदे गटाकडून (Shinde Group) आदित्य ठाकरेंविरोधात बॅनरबाजी करत आंदोलन केले. यात आदित्य ठाकरेंचा (Aditya Thackeray) उल्लेख महाराष्ट्राचे परमपूज्य युवराज असा करण्यात आला. तसेच आदित्य ठाकरेंची ‘दिशा’ नेहमीच चुकली, असा टोला अधिवेशनाच्या (Maharashtra Assembly Session) शेवटच्या दिवशी करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान लगावला. यावर आता आदित्य ठाकरे यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. शिंदे गटातील आमदारांची कीव येते. तुमच्यात हिंमत असेल तर आधी राजीनामा (Resignation) द्या. चला मीही राजीनामा देतो आणि निवडणुकीला (Election) सामोरा जातो, असं थेट आव्हान त्यांनी दिलं.

 

मला त्यांची कीव येते

शिंदे गटाच्या आमदारांनी केलेल्या आंदोलनानंतर (Maharashtra Assembly Session) आदित्य ठाकरे यांनी विधानभवनात (Vidhan Bhavan) माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हणाले, गळ्यात पोस्टर लावून त्यांना कसे उभे केले आहे हे अख्खा महाराष्ट्र पाहत आहे. एका मंत्रीपदासाठी या गद्दार सरकारमध्ये किती काय करायला लागते. मला खरोखर यांची कीव येते. यांच्यावर घरात चांगले संस्कार झाले असते, तर आधी गद्दारी केली नसती आणि असे बिचाऱ्यासारखे उभे राहिले नसते.

 

मी तर म्हणतो की विधानसभा…

यावेळी आदित्य ठाकरे यांनी राजीनामा देऊन थेट निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले.
ते म्हणाले, 40 लोकांनी राजीनामा द्यावा, मीही देईन. आपण निवडणूका लढवू.
मी तर म्हणतो की विधानसभा बरखास्त करा, संपूर्ण महाराष्ट्रात निवडणुका लावा. होऊन जाऊ दे एकदाचं, असं आव्हान त्यांनी दिले.
ज्याची भीती वाटते, त्याच्यावर टीका जास्त केली जाते.
पायऱ्यांवर उभे असणाऱ्यांची कीव येते. त्यांना खरी अपेक्षा होती मंत्रीपदाची.
ती मिळाली नाही, म्हणून त्यांना श्रेष्ठींना खुश करण्यासाठी माझ्याविरोधात बोलायला लागत आहे.

 

Web Title :- Maharashtra Assembly Session | aidtya thackeray criticize rebel mlas over vidhan sabha session

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

 

Must Read
Related News