वीर सावरकर वादावरून फडणवीस ‘आक्रमक’, म्हणाले – ‘ही महाराष्ट्राची विधानसभा आहे की इंग्रजांची ?’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि नेते राहुल गांधी यांनी काल वीर सावरकरांच्या संदर्भात केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे आज राज्याच्या विधानसभेत पहिल्याच दिवशी पडसाद उमटले. परंतू आता विरोधक आक्रमक झाले आहेत. सावरकरांच्या विषयासंदर्भात बोललेलं काहीही रेकॉर्डवर घेतलं जाणार नाही असे निर्देश विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्याने आक्रमक झाले. यावर संतापलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सवाल केला की ही महाराष्ट्राची विधानसभा आहे की इंग्रजांची? यामुळे गोंधळ झाला आणि सभागृह 10 मिनिटे तहकूब करण्यात आले.

भाजपसह सावकर प्रेमींकडून मागणी होत होती की झारखंडमधील सभेत ‘रेप इन इंडिया’ या विधानाबद्दल माफी मागावी. परंतू माफी मागायला माझे नाव काही राहुल सावरकर नाही असे म्हणत राहुल गांधींनी वादाला तोंड फोडले. त्यामुळे राज्यातील राजकीय पक्षात देखील जोरदार वाद झाला. भाजपकडून काँग्रेसबरोबर सत्तेत असलेल्या शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे दुसऱ्या दिवशी विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनात सावरकरांच्या अपमानाचा मुद्दा चांगलाच पेटला. हा मुद्दा उपस्थित करुन विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकला.

महाविकासआघाडीच्या पहिल्याच हिवाळी अधिवेशनाची सुरुवात प्रथेप्रमाणे वंदे मातरम् ने झाली. देवेंद्र फडणवीस यांनी नियम 57 अन्वये कामकाज बाजूला ठेवून चर्चेची मागणी केली. परंतू देशाचे सरन्यायाधीश झालेले महाराष्ट्राचे सुपुत्र शरद बोबडे यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावानंतर आपले मुद्दे मांडण्याची सूचना विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. हा प्रस्ताव एकमतमाने संमतही करण्यात आला. यानंतर फडणवीस यांनी वीर सावरकर यांचा देशाच्या स्वतंत्र्यात असलेल्या योगदानाची माहिती दिली. त्यांनी यावेळी राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. परंतू विधानसभाध्यक्षांनी हे बोलणं रेकॉर्डवर न घेण्याचे निर्देश दिले. त्यामुळे संतापलेल्या विरोधकांनी घोषणाबाजी सुरु केली. यामुळे सभाग्रहाचे काम 10 मिनिटे तहकूब करण्यात आले.

कामकाज सुरु झाल्यानंतर फडणवीस यांनी आपला मुद्दा लावून धरला. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, सावरकरांविषयी रेकाॅर्ड घेतलं जाणार नसेल तर हा मुद्दा कुठं उपस्थित करणार ही महाराष्ट्राची विधानसभा आहे की इंग्रजांची असा संतप्त सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. यानंतर विरोधी आमदारांनी दादागिरी नही चलेगी अशा घोषणा दिल्या.

त्याआधी राहुल गांधींच्या विधानाबद्दल भाजपच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर निषेध नोंदविला. विरोधक विधिमंडळात ‘मी सावरकर’ अशा टोप्या घालून आले होते. यावेळी माफी मांगो, माफी मांगो.. राहुल गांधी माफी मांगो… अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/