Maharashtra Assembly Speaker Election | विधानसभेचे नवे अध्यक्ष कोण?; राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा, पण कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Assembly Speaker Election | सत्तास्थापनेचा दावा झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदांचा शपथविधी सोहळा कालच पार पडला. यानंतर आता विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीचे (Maharashtra Assembly Speaker Election) वारे लागले आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या नावाची मोठी चर्चा रंगली आहे. त्याचबरोबर शिंदे गटाकडून दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्या नावाची चर्चा आहे. कोणाची वर्णी लागणार याबाबत आजच्या बैठकीत फायनल होणार आहे.

 

मागील विधानसभा निवडणुकीत विखे-पाटील यांनी काँग्रेस (Congress) सोडून भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला. त्यानंतर सरकार न आल्याने विखे-पाटील यांना संधी मिळू शकली नव्हती. तरी देखील त्यांनी भाजपमध्ये सक्रिय राहून राज्यातील तसेच दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांशी संपर्क वाढवला. पक्षाच्या उघड आणि गोपनीय मोहिमेत त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. त्यामुळे आता सरकार आल्यावर त्यांना त्यांच्या इच्छेनुसार पद मिळेल, अशी कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे. पण, आता मंत्रिपदाऐवजी त्यांचे नाव अध्यक्ष पदासाठी समोर आल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. मात्र यावर शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. (Maharashtra Assembly Speaker Election)

 

विधिमंडळाकडून पत्रक जारी –
विधिमंडळ सचिवालयाने पत्रक जारी केलं असून त्यानुसार 3 जुलै रोजी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.
त्यासाठी विधानसभेच्या सर्व आमदारांना उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
3 आणि 4 जुलै रोजी विधानसभेचं विशेष अधिवेशन पाचारण करण्यात आलं आहे.
त्यामध्ये पहिल्याच दिवशी ही निवडणूक पार पडणार आहे.
2 जुलै रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे.

 

Web Title :- Maharashtra Assembly Speaker Election | bjp leader radhakrishna vikhe patils name is in assembly speaker race vikhe patil supporters are not happy with this news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | अँटी करप्शनचे पोलीस असल्याचे सांगून नगररचना उपसंचालकाला लुबाडण्याचा प्रयत्न करणारा नाशिकच्या पोलीस कर्मचार्‍यासह तिघे गजाआड

 

Nanded to Pune Railway | रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! नांदेड-हडपसर रेल्वे आता दररोज नांदेड ते पुण्यापर्यंत धावणार

 

Manipur Landslide | मणिपूरमध्ये दरड कोसळल्याने 14 जणांचा मृत्यू; लष्करी जवानांचा समावेश, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले