Maharashtra Assembly Speaker Election | राज्यपाल विरुद्ध ‘मविआ’ संघर्ष वाढणार?, ठाकरे सरकारचा ‘हा’ प्रस्ताव फेटाळला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Assembly Speaker Election | अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget Session) विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक व्हावी यासाठी महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) जोरदार प्रयत्न सुरु असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी महाविकास आघाडी सरकारचा विधानसभा अध्यक्ष निवडणुकी (Maharashtra Assembly Speaker Election) संदर्भातील प्रस्ताव फेटाळून लावला (Proposal Rejected) आहे. हा सरकारला आणखी एक धक्का असल्याचे बोलले जात आहे. राज्यपालांनी प्रस्ताव फेटाळून लावल्याने या अधिवेशनात अध्यक्षपदाची निवडणूक होणार नाही हे स्पष्ट झाले आहे.

 

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे प्रकरण कोर्टात (Court) प्रलंबित (Pending) असल्याने विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीची तारीख निश्चित करु शकत नाही, असे स्पष्टीकरण राज्यपालांनी दिले आहे. विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या मुद्यावरुन भाजपने (BJP) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल (Petition Filed) केली आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. याच गोष्टीचा धागा  पकडून राज्यपालांनी निवडणूक प्रस्ताव परत पाठवत निवडणूक पुढे ढकलली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी विरुद्ध महाविकास आघाडी सरकार असा संघर्ष पहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नाना पटोलेंची राज्यपालांवर टीका
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा महाविकास आघाडी सरकारचा प्रस्ताव राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी फेटाळून लावल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress State President Nana Patole) यांनी राज्यपालांवर टीका केली आहे.
विधानसभा अध्यक्षपदाच्या घटनात्मक पदाच्या निवडणुकीवरुन राजकारण सुरु झाले असून ते थांबवता आले असते.
राज्यपालांनी विधानसभा अध्यक्षांची जागा भरण्यासाठी परवानगी द्यायला हवी होती. पंरतु त्यांचे हे वागणे राज्यपालासारखे नाही,
तर ते भाज्यापालासारखे आहे, अशा शब्दात पटोले यांनी राज्यपालांवर टिप्पणी केली.

 

Web Title :- Maharashtra Assembly Speaker Election | Maharashtra governor bhagat singh koshyari rejected the state governments proposal for the election of assembly speaker

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

IPS Saurabh Tripathi | गुन्हे शाखेच्या उपायुक्तांकडूनच खंडणीची मागणी?, DCP सौरभ त्रिपाठी फरार घोषीत, मुंबई पोलीस दलात खळबळ

 

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 207 नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

PMC Medical College Pune | …म्हणून भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय PPP तत्वावर चालविण्याचा प्रस्ताव

 

Supriya Sule | 2022-23 च्या अर्थसंकल्पात काश्मिरी पंडितांसाठी काय तरतूद केली? सुप्रिया सुळेंचा केंद्रावर निशाणा