Maharashtra Assembly Speaker Election | ठरलं ! BJP कडून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Assembly Speaker Election | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रिपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर विधानसभा अध्यक्ष पदाच्या उमेदवाराची (Maharashtra Assembly Speaker Election) चर्चा होत आहे. अखेर भाजपकडून (BJP) उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपकडून राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. नार्वेकर यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. एकनाथ शिंदे गट आणि भाजपचे संख्याबळ पाहता राहुल नार्वेकर पुढील विधानसभा अध्यक्ष होणार, यावर जवळपास निश्चित असल्याचे दिसतेय.

 

महाराष्ट्र विधानसभेचं अधिवेशन एक दिवसाने पुढे ढकलण्यात आलंय. शनिवारी आणि रविवारी अर्थात 2 आणि 3 जुलैला होणारे अधिवेशन पुढे ढकलण्यात आलं आहे. हे अधिवेशन आता 3 आणि 4 जुलै म्हणजे येत्या रविवार आणि सोमवारी होणार आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी नव नियुक्त सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी हे अधिवेशन बोलावलं आहे. याच अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांचीही निवड केली जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

 

Web Title :- Maharashtra Assembly Speaker Election | rahul narvekar bjp candidate vidhan for sabha speaker maharashtra

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Import Duty on Gold | आता महाग होणार सोने खरेदी करणे, डिझेल-पेट्रोलच्या निर्यातीवर सुद्धा वाढला टॅक्स

 

New TDS Rules | आता इनफ्लुएन्सर्सला सुद्धा द्यावा लागेल टीडीएस! आजपासून लागू झाले नवीन नियम

 

Mouni Roy Glamorous Look | मौनी रॉयनं कॅमेरा समोर दाखवला ग्लॅमरस अंदाज, व्हायरल फोटो पाहून चुकेल तुमच्याही काळजाचा ठोका…