Maharashtra Assembly Speaker | विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसमध्ये हालचाली; ‘या’ नावांची चर्चा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – राज्याचं पावसाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Monsoon Session) येत्या 5 आणि 6 जुलैला होणार आहे. मागील अधिवेशनापासून प्रलंबित असलेल्या विधानसभा अध्यक्ष पदाबाबत (Assembly Speaker) राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्य सरकारला पत्र (Governor Bhagat Singh Koshyari Letter to Maharashtra Government) पाठवलं. या पत्रात विधानसभा अध्यक्षपदाचा (Assembly Speaker) निर्णय घ्याव, याबद्दल आठवण करुन दिली. या पत्रानंतर विधानसभा अध्यक्षांच्या (Maharashtra Assembly Speaker) निवडच्या मुद्यावरुन बरीच चर्चा रंगू लागली आहे.

 

विधानसभा अध्यक्ष काँग्रेसचा

दरम्यान, अधिवेशनात विधानसभा अध्याक्षांची (Assembly Speaker Election) निवड होणार आहे. विधानसभा अध्यक्षांची निवड याच अधिवेशनात होणार आहे आणि तो काँग्रेसचा (Congress) असेल, असे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Congress leader Balasaheb Thorat) यांनी म्हटले होते. यानंतर अध्यक्ष निवडीसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदासाठी राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut as Assembly Speaker) यांच्या नावाचा विचार काँग्रेस करत आहे. सध्या हे पद काँग्रेसकडे आहे.

 

विधानसभा अध्यक्षपदासाठी ही नावे चर्चेत

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र पाठवल्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या निवडीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सध्या हे पद काँग्रेसकडे (Congress) असून ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांचे नाव अध्यक्षपदाच्या शर्यतीत आले आहे. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे (Senior Congress leader Sushilkumar Shinde) यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे (MLA Praniti Shinde) यांना राज्यमंत्रीपदावर संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुत्रांच्या माहितीनुसार काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील (Congress Maharashtra in-charge H.K. Patil) यांनी राज्यात दलित मतदारांना पक्षाकडे वळवण्याची सूचना केली आहे. तसेच काँग्रेसमधून संग्राम थोपटे (Sangram Thopte), सुरेश वरपूडकर (Suresh Varpudkar) आणि अमिन पटेल (Amin Patel) यांच्या नावाची देखील चर्चा आहे.

 

काँग्रेसमध्ये कुठलीही अंतर्गत नाराजी नाही

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole) म्हणाले होते की,
विधानसभा अध्यक्ष निवड या विधिमंडळ अधिवाशनात होणार आहे.
विधानसभा अध्यक्षांच्या नावाची घोषणा 5 जुलै रोजी होईल.
काँग्रेसमध्ये कुठलीही अंतर्गत नाराजी नाही.
मी मंत्रिपादाची मागणी (I did not ask for a Ministry) केली नाही.
पक्ष देईल ती जबाबदारी मी पार पाडत आहे आणि माझ्यावर कोणताही मंत्री नाराज नाही.
महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) कुठलीही नाराजी नाही.
शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुख्यमंत्र्यांची काल भेट घेतली.
यामध्ये अधिवेशन आणि इतर मुद्यांवर चर्चा झाली.
अधिवेशनात केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात नवे धोरण (New policy against the Central Government’s Agriculture Act) आम्ही मांडणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.

Web Titel :- Maharashtra Assembly Speaker | monsoon session of maharashtra name discussion assembly speaker nitin raut praniti shinde minister

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharera | महारेराचा मोठा निर्णय ! ‘त्या’ बिल्डरांना बसणार चाप

Covishield | ऑक्सफर्डचे नवे संशोधन ! ‘कोविशील्ड’चा तिसरा डोस घेतल्यास कोरोनापासून अधिक सुरक्षा

Pune News | पुण्यात भाजप नगरसेविकेच्या पती आणि भावाकडून रहिवाशाला मारहाण, व्हिडीओ व्हायरल