अजित पवारांकडून भाजपला पहिला ‘धक्का’ ! सरकारनं घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

नागपूर :  पोलीसनामा ऑनलाइन – ठाकरे सरकारने सत्तेवर येताच अनेक महत्वाचे निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. हिवाळी अधिवेशनात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. पुणे महानगरपालिकेतील प्रभाग पद्धती रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून पहिल्याच अधिवेशनात घेण्यात आला आहे. प्रभाग पद्धतीमुळे पुणे महानगरपालिकेत भाजपची सत्ता आली होती.

राष्ट्रवादीचे अजित पवार यासाठी आग्रही होते असे सांगण्यात येते त्यामुळेच सत्तेवर येताच पहिल्याच अधिवेशनात सरकारने हा निर्णय घेतला आहे. याबाबतच्या निर्णयाला विधानसभेत मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता 2022 मध्ये होणारी महानगरपालिकेची निवडणूक ही वॉर्ड पद्धतीने होणार आहे.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमात सुधारणा करणारे विधेयक विधिमंडळाच्या अधिवेशनात मंजूर करण्यात आले. त्यानुसार पुण्यासह सर्वच महापालिकांच्या निवडणुका एकसदस्यीय पद्धतीने होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.सध्याची प्रभागरचना ही 2011 च्या लोकसंख्येच्या प्रमाणात आहे. त्यात किमान 17 ते 20 हजार लोकसंख्येसाठी एक नगरसेवक, असे प्रमाण आहे.

पुणे मनपात सध्या 162 नगरसेवक आहेत. प्रभाग पद्धत रद्द करण्यात आल्याने ही संख्या 168 पर्यंत जाईल. वॉर्ड पद्धतीमुळे नगरसेवकांची संख्या सहा ने वाढणार आहे. भाजपने सुरु केलेल्या पद्धतीने अनेक महानगर पालिकांमध्ये भाजपला फायदा झाल्याचा आरोप विरोधातील अनेक नेत्यांनी केला होता. त्यामुळे आता विरोधक सत्तेवर येताच त्यांनी हा निर्णय बदलला आहे. त्यामुळे आता या नव्या निर्णयामुळे सत्तेवर आलेल्याना कितपत फायदा होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/