चंद्रपूर : Maharashtra Asssembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. दरम्यान शरद पवार (Sharad Pawar) यांनी राजकीय डाव टाकत भाजप (BJP) आणि शिंदे सेनेतील (Shivsena Shinde Group) काही बडे मासे गळाला लावले आहेत. त्यात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अगदी जवळचे मानले जाणारे आमदार किशोर जोरगेवार (Kishor Jorgewar MLA) हे राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत.
जोरगेवार हे भाजपमध्ये प्रवेश करणार अशीही चर्चा होती. पण त्यांनीच या चर्चेला पूर्ण विराम देत आपण शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. विद्यमान आमदार पवारांच्या गळाला लागल्यामुळे शिंदे आणि भाजपसाठी हा धक्का समजला जात आहे.
चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या हातात लवकरच तुतारी दिसणार आहे. चंद्रपूर विधानसभेची जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला मिळाल्यास, मी निवडणूक लढण्यास तयार असल्याचं जोरगेवार यांनी जयंत पाटील यांना सांगितले आहे. चंद्रपूर विधानसभेची (Chandrapur Assembly Constituency) जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला मिळावी यासाठी प्रयत्न केले जात आहे.(Maharashtra Asssembly Election 2024)
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
पोलीसनामाच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/policenamaa