इसिसच्या आणखी एका संशयिताला मुंब्र्यातून अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र एटीएसने कारवाई करत मुंब्र्यातून आणखी एका संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे. एटीएसने काल केलेल्या या कारवाईत लॅपटॉप, टॅबलेट, हार्ड डिस्क, पेन ड्राइव्ह, राउटर आणि काही मोबाइल जप्त केले आहेत. यासोबतच एटीएसला संशयिताकडे एक डायरीही सापडली आहे.

मुंब्र्यातील या आणखी एका अटकेमुळे संशयितांची संख्या १० वर गेली आहे. आयसिस या दहशतवादी संघटनेसाठी काम करत असल्याच्या संशयावरून एटीएसने २२ जानेवारीला मुंब्रा आणि औरंगाबादमधून एकूण ९ जणांना अटक केली होती.

ठाण्यातील मुंब्रा येथील तल्हाह उर्फ अबु बकार हनीफ पोतरिक (वय २४,रा एमरॉल्ड टॉवर दोस्ती प्लॅनेट नॉर्थशिल्ड डायव्हर , मुंब्रा ठाणे) याला दहशवाद विरोधी पथकाने अटक केली. त्याला आज औरंगाबाद येथील न्यायालयात एटीएस ने हजर केले. न्यायालयाने त्याला ५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तल्हाह याचे बॅचलर ऑफ मनेजमेंट स्टीडी चे शिक्षण झालेले आहे. त्याच्यावर यापूर्वी अटक केलेल्या ९ संशयित आरोपींनी रचलेल्या कटात सहभागी असल्याचा आरोप आहे