‘लिंग’ बदलल्यानंतर महाराष्ट्रातील पोलिस कर्मचार्‍यांनं केलं मुलीसोबत लग्न, म्हणाला – ‘आता आनंदात जगेल’ (व्हिडीओ)

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रातील पोलीस काॅंस्टेबल ललित साळवे यांनी एका वर्षापूर्वी लिंग परिवर्तन शस्त्रक्रिया (सेक्स चेंज सर्जरी) केली होती. 16 फेब्रुवारीला त्यांनी एका महिलेसह विवाह केला आहे. साळवे यांचा ललितापासून ललित पर्यंतचा प्रवास अडथळ्याचा आणि कायदेशीर लढाईचा होता. त्यांनी मे 2018 साली मुंबईच्या रुग्णालयात सेक्स रिअसाइनमेंट सर्जरीचा पहिला टप्पा पूर्ण केला होता.

त्यानंतर दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यातील शस्त्रक्रिया पूर्ण करुन बीड जिल्ह्यातील माजलगाव तहसीलच्या राजेगाव गावातील रहिवासी साळवे (वय 30) यांनी अखेर आपली ओळख बदलून ललित केली. त्यानंतर साळवे यांना महाराष्ट्रातील पोलीस दलात पुरुष काॅंस्टेबलचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली. आता त्यांनी रविवारी औरंगाबाद शहरात एका महिलेशी विवाह केला आहे.

साळवे म्हणाले की तिसऱ्या चरणाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर माझा पुनर्जन्म झाला. मी आता लग्नानंतर नवे जीवन सुरु केले आहे आणि आता मी आनंदी आहे. माझे कुटूंबीय सदस्य माझ्या लग्नाने खुश आहेत.

2014 साली ट्रांससेक्शुअलचे लक्षण दिसल्यानंतर त्यांना धक्का बसला होता. त्यांच्या वाय स्टेट्स जास्त असल्याने ते पुरुषांऐवजी महिलांकडे आकर्षित होऊ लागले होते. अनेक चाचण्यानंतर डॉक्टरांनी त्यांना लिंग परिवर्तन शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. पोलीस दलात सहभागी झाल्यानंतर त्यांनी राज्य पोलीस विभागाशी संपर्क साधला जेणे करुन ते लिंग परिवर्तन शस्त्रक्रिया करु शकतील.

विभागाने त्यांची याचिका फेटळली होती कारण पुरुष आणि महिला यांच्या काॅंस्टेबल पदासाठीचे पात्रता मापदंड वेगवेगळे असतात, ज्यात उंची आणि वजनाचा समावेश आहे. काॅंस्टेबलने एका महिन्याची सुट्टी मागितली होती जेणेकरुन सेक्स रिअसाइनमेंट सर्जरी केली जाऊ शकेल. परंतु बीड पोलीस अधिकाऱ्यांनी या विनंतीला अस्वीकार केले, ज्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठवला. उच्च न्यायालयाने साळवे यांना महाराष्ट्र प्रशासकिय लवादाकडे याचिका करण्याचे निर्देश दिले होते कारण हे एक सेवा प्रकरणं होते. परंतु त्यानंतर साळवे यांना सेक्स चेंज सर्जरी करण्यासाठी सुट्टी देण्यात आली होती.