Maharashtra COVID-19 : महाराष्ट्रात नव्या लाटेची शंका ! 42 दिवसानंतर पुन्हा सर्वात जास्त नवीन केस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा कहर थांबताना दिसत नाही. प्रकरणात विक्रमी घसरणीच्या 42 दिवसानंतर महाराष्ट्र पुन्हा एकदा देशातील सर्वाधिक प्रभावित राज्य बनले आहे. 3365 नवी कोविड-19 रूग्णांसह राज्याने केरळला सुद्धा मागे टाकले आहे. केरळात सोमवारी 2884 रूग्ण सापडले होते. राज्यात मागील वर्षातील 30 नोव्हेंबरनंतर प्रथमच इतकी प्रकरणे सापडली आहेत.

औरंगाबादमध्ये शनिवारी रात्री पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, जर प्रकरणे लागोपाठ वाढत राहिली तर, आम्हाला मुख्यमंत्र्यांसोबत बोलून कडक पावले उचलावी लागतील. सोमवारी राज्यात 23 मृत्यू सुद्धा झाले. आता महाराष्ट्रात एकुण संक्रमितांचा अकडा 20 लाख 67 हजार 643 वर पोहचला आहे. तर, आतापर्यंत 51 हजार 552 रूग्णांचा मृत्यू झाले आहेत. मागील 6 दिवसांपासून राज्यात रोज 3 हजारपेक्षा जास्त प्रकरणे सापडत आहेत.

कोविड-19 ची वाढती प्रकरणे पाहता बीएमसीने धारावीच्या काही भागात मोबाइल टेस्टिंग व्हॅन तैनात केली आहे. अधिकार्‍यांना पुन्हा एकदा प्रकरणे वाढण्याची भिती आहे. धारावी, दादर आणि माहीमच्या जी नॉर्थ वॉर्डमध्ये साप्ताहिक ग्रोथ रेट 0.12 टक्के दिसून आला. नुकतेच महाराष्ट्र सरकारने केरळहून येणार्‍या प्रवाशांसाठी आरटी-पीआरसी टेस्ट अनिवार्य केली आहे. संपूर्ण देशाच्या तुलनेत केरळ आणि महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती अनियंत्रित दिसून येत होती. यामुळे केंद्र सरकारने दोन्ही राज्यांमध्ये हायलेव्हल टीम पाठवण्याचा सुद्धा निर्णय घेतला होता.

कोरोना चाचण्या करण्याकडे दुर्लक्ष
सोमवारी भारतात 9 हजार 93 रूग्ण सापडले. जर मागील दोन सोमवारची तुलना केली तर प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. सोमवारी प्रकरणे कमी असण्याचे कारण हे विकेंडला स्टाफची कमतरता आणि कमी टेस्टिंग आहे. या सोमवारी 4.9 लाखांपेक्षा सुद्धा कमी चाचण्या झाल्या. 6 महिन्यांमध्ये पहिल्यांदा टेस्टिंगची संख्या इतकी कमी झाली आहे. सोमवारी देशात 82 लोकांचा मृत्यू झाला. यानंतर मृतांचा आकडा 1 लाख 55 हजार 844 वर पोहचला आहे.