Maharashtra Band | पुण्यात शासकीय यंत्रणेचा गैरवापरकरून बंद करण्याचा प्रयत्न – भाजप शहराध्यक्ष मुळीक (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Band | पुणे शहरात शासकीय यंत्रणेचा गैरवापरकरून महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) बंद करण्यात येत आहे. हा बंद शेतकऱ्यांसाठी नसून मंत्र्यांचे भ्रष्टाचार उघडकीस येत असल्याने लक्ष विचलित करण्यासाठी असल्याचा आरोप भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Pune bjp city president jagdish mulik) यांनी केला आहे. (Maharashtra Band)

 

 

उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री मिश्रा यांच्या मुलाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गाडी घातल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. यामध्ये आठ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची (Maharashtra Band) हाक देण्यात आली होती. पुणे शहरात देखील हा बंद पाळण्यात येत आहे. महाविकास आघाडीच्या पुणे शहरातील (Pune) नेत्यांनी बाईक रॅली तसेच पदयात्रा काढत व्यापाऱ्यांनी बंद पाळण्याचे आवाहन केलं आहे.

 

दरम्यान, शहरात आघाडीच्या नेत्यांकडून दमदाटी करत दुकाने बंद करायला भाग पाडल जात आहे.
कोणाला अशाप्रकारे दमबाजी केली जात असेल तर पुणेकरांनी भाजप लोकप्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन मुळीक यांनी केलं आहे.

 

भाजप पुणेकरांच्या पाठीशी असून कोणी गुंडगिरी करण्याचा प्रयत्न केल्यास पोलिसांत गुन्हा दाखल करता येईल, असंही मुळीक यांनी सांगितले आहे.

 

Web Title :- Maharashtra Band | Attempt to shut down the government system in Pune by misusing it – BJP city president jagdish Mulik

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

TAMA Electric Car | 1947 मध्येच बनवण्यात आली होती टेस्लाच्या तोडीची इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या 130 वर्षांचा जुना इतिहास

Gold Price Update | 9320 रुपयांपर्यंत कमी झाला सोन्याचा दर ! 27483 रुपयात मिळतंय 1 तोळा, ‘इथं’ जाणून घ्या 14 ते 24 कॅरेट सोन्याचा नवीन दर

Aadhaar कार्डच्या फ्रॉडपासून वाचायचे असेल तर लवकर अपडेट करा ‘हा’ नंबर, UIDAI ने सांगितली संपूर्ण प्रक्रिया; जाणून घ्या