Maharashtra Band | नाना पटोलेंचे अमृता फडणवीसांना प्रत्युत्तर, म्हणाले – ‘त्या आमच्या सुनबाई, त्यामुळं….’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  लखीमपूर हिंसाचाराच्या (Lakhimpur violence) पार्श्वभूमीवर आज (सोमवार) ‘महाराष्ट्र बंद’ (Maharashtra Band) करण्याची घोषणा राष्ट्रवादीचे (NCP) नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केली होती. महाराष्ट्र बंदमध्ये (Maharashtra Band) सरकारमधील इतर सहकारी पक्ष ही सहभागी झाले आहेत. शिवसेना (Shivsena) आणि काँग्रेसनंही (Congress) या बंदला पाठिंबा दर्शवला आहे. महाविकास आघाडीच्या बंदवरुन भाजपने (BJP) टीकास्त्र सोडले असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (amruta Fadnavis) यांनी आज वसुली सुरु आहे की बंद ? असे ट्विट करत सरकारवर निशाणा साधला होता. यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी प्रत्युत्र दिल्यानंतर आता काँग्रेसेचे नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी उत्तर दिले आहे.

त्या आमच्या सुनबाई…

राज्यातील लोकांनी बंदला प्रतिसाद दिला, परंतु भाजपकून आज अनेक ठिकाणी महाराष्ट्र बंदला (Maharashtra Band) विरोध केला.
देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विट करुन आज वसुली सुरु आहे की बंद ? असा सवाल केल्यानंतर याला काँग्रेस नेते नाना पटोले यांनी यावर बोलणं टाळलं.
ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे आमच्यापेक्षा लहान आहेत. त्यामुळे अमृता फडणवीस या आमच्या सुनबाई आहेत, त्यामुळे मी त्यांच्यावर बोलणार नाही.

दरम्यान, अमृता फडणवीस यांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
‘वहिनींच्या गाण्यात सुरांचा जसा ताळमेळ नसतो तसं त्यांच्या बोलण्यात सुद्धा आजकाल काही ताळमेळ नसतो?
संवेदनाहिन मनाचं आणि अर्धवट ज्ञानाचं परफेक्ट कॉम्बिनेशन (Perfect combination) म्हणजे अमृता वहिनी’, असं ट्विट चाकणकर यांनी केलं आहे.

 

Web Title : Maharashtra Band | congress leader nana patole on amruta fadnavis twit

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 91 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Baby Products | बेबी प्रॉडक्टमध्ये वापरले जाणारे केमिकल मुलांच्या IQ आणि मेमरीला करते प्रभावित – रिसर्च

Mutual Fund Calculator | ‘या’ म्युच्युअल फंडने गुंतवणुकदारांचे पैसे एक वर्षात केले ‘दुप्पट’; जाणून घ्या