Maharashtra Band | पुण्यात ‘सरकारी’ बंदला मध्य वस्तीत ‘उर्त्स्फुत’ प्रतिसाद ! उपनगरांमध्ये सर्व व्यवहार सुरळीत, पीएमपी बसगाड्या, रिक्षा बंद

पुणे : लखीमपूर येथील हिंसाचाराच्या (lakhimpur kheri violence) विरोधात महाविकास आघाडी सरकारने (maha vikas aghadi government) आयोजित केलेल्या महाराष्ट्र बंदला (Maharashtra Band) पुणे शहराच्या (Pune) मध्य वस्तीत कडकडीत प्रतिसाद मिळालेला दिसत असला तरी उपनगरामध्ये मात्र सर्व व्यवहार सकाळी तरी सुरळीत सुरु असल्याचे दिसून येत आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना (Shivsena), काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) या बंदला पाठिंबा दिला आहे. तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते प्रामुख्याने सकाळपासून रस्त्यावर उतरलेले दिसून येत आहे. ज्या ठिकाणी दुकाने उघडी दिसतात, त्यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन करताना दिसून (Maharashtra Band) येत आहे.

गुलटेकडी मार्केटयार्ड (gultekdi, market yard) बंद ठेवण्याचा निर्णय हमाल, मापाडी, टेम्पो चालक संघटनांनी घेतला आहे. त्यामुळे आज मार्केटयार्डमध्ये कोणतीही आवक झालेली नाही. पीएमपीएमएल (PMPML) व्यवस्थापनाने दुपारी १२ पर्यंत बससेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर रिक्षा पंचायतीसह आपने या बंदला पाठिंबा दिल्याने पीएमपी बस, रिक्षा या रस्त्यावर दिसून येत नाही. तसेच लक्ष्मी रोडवरील दुकाने ही सोमवारी बंद असतात. सणाच्या कालावधीत ती सुरु ठेवण्यात येत असली तरी व्यापारी महासंघाचे दुपारी ३ वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवणार असल्याचे जाहीर केल्याने मध्य वस्तीतील जवळपास सर्व दुकाने बंद (Maharashtra Band) असल्याचे दिसून येत आहे.

एस टी बसस्थानकांवर किरकोळ गर्दी दिसून येते़ येणार्‍या एस टी बसगाड्यांमध्ये अतिशय तुरळक प्रवासी दिसून येतात. महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस दलाने ५ हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

हे देखील वाचा

Post Office Scheme | पोस्टाच्या ‘या’ 7 योजनांमध्ये करा गुंतवणूक, काही वर्षातच पैसे होतील दुप्पट; जाणून घ्या

Green Energy Sector | ग्रीन एनर्जी सेक्टरमध्ये Tata आणि Adani यांच्यावर आघाडी घेण्यासाठी मुकेश अंबानी यांनी खर्च केले 5800 कोटी; जाणून घ्या डिटेल्स

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Maharashtra Band | ‘Government’ bandh in Pune ‘Urtsfut’ response in the central area! All transactions in the suburbs are smooth, PMP buses, rickshaws closed

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update