Maharashtra Band |  ‘बेस्ट’ आणि ‘एसटी’ महामंडळाच्या बसचा बंदमध्ये सहभाग, वाहतुकीवर होणार थेट परिणाम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना (Lakhimpur violence) गाडीखाली चिरडून ठार मारले होते. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारमधील (MVA) तिन्ही पक्षांनी सोमवारी (दि. 11) महाराष्ट्र बंद (Maharashtra Band) पुकारला आहे. या महाराष्ट्र बंदला (Maharashtra Band) मुंबईतील बेस्ट बस (BEST, Mumbai) आणि एसटी बसचा (ST Bus) समावेश असणार आहे. शिवसेना प्रणित बेस्ट कामगार सेनेने (Shiv Sena Pranit Best Kamgar Sena) याला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे दोन्ही वाहतूक सेवा बंद राहणार आहे.

 

 

महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), काँग्रेस (Congress) आणि शिवसेनेने (Shivsena) उद्या महाराष्ट्र बंदची (Maharashtra Band) हाक दिली आहे. राज्यातील विविध ठिकाणी महाराष्ट्र बंदची तयारी होत आहे. शाळा (Schools) आणि माहाविद्यालय बंद (colleges closed) असणार आहेत. तर दुसरीकडे मुंबईची बेस्ट वाहतूक सेवाही बंद राहणार आहे. त्याच पाठोपाठ गावागावात पोहोचलेली एसटी बस सेवा देखील बंद राहणार आहे. त्यामुळे वाहतुकीवर उद्या परिणाम होणार आहे.

 

दरम्यान, उद्याच्या बंदमध्ये बेस्ट वर्कर्स युनियन (Best Workers Union) सहभागी होणार नाही.
बेस्ट ही अत्यावश्यक सेवा आहे. अत्यावश्यक सेवा सुरु राहणार असा शासनाचा निर्णय आहे.
त्यामुळे बेस्ट बंदमध्ये सहभागी होऊ शकत  नाही.
बेस्ट कामगार सेना कर्मचाऱ्यांना बंदचे आवाहन करुन राज्य सरकारच्या (state government) निर्णयाचे उल्लंघन करत आहे,
असा आरोप कामगार नेते शशांक राव (Shashank Rao) यांनी केला आहे.
तसेच अत्यावश्यक सेवा बंद ठेवण्याचा अधिकार बेस्ट कामगार सेनेला कुणी दिला.
कामगारांच्या अधिकारांसाठी बंद पुकारला तर कारवाई होते. मग आता बंद केला तर कारवाई होणार नाही,
याची खात्री सुहास सामंत (Suhas Samant) देणार का ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

 

Web Title :- Maharashtra Band | maharashtra band best and st bus participate in bandh support of shiv sena organization

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 1,823 जण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Shashi Tharoor | ‘संसदेत महात्मा गांधींच्या बाजूला सावरकरांचा फोटो कशासाठी?’ शशी थरूर यांचा सवाल

Nitesh Rane | नितेश राणेंची शिवसेनेवर बोचरी टीका, म्हणाले- ‘एखादा पेंग्विन कमी पाळा पण…’