Maharashtra Band | राज्यात महाराष्ट्र बंदला उर्त्स्फुत प्रतिसाद !

मुंबई : Maharashtra Band | महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) आयोजित केलेल्या महाराष्ट्र बंदला (Maharashtra Band) राज्यात सर्वत्र उर्त्स्फुत प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आठवड्याचा पहिलाच दिवस असला तरी मुंबईत (Mumbai) चाकरमान्यांची रस्त्यावर तुरळक गर्दी दिसून येत आहे. उपनगरातून नोकरीसाठी येणार्‍यांनी आज बंद पाहून घरीच थांबण्याचे पसंत केलेले दिसून येत आहे.

नाशिक (Nashik), वाशी (Washi), पुणे (Pune) येथील बाजार बंद (Market Yard Close) असून तेथे आज सकाळी कोणतीही आवक झाली नाही. सोलापूर बाजार (Solapur Market Yard) समितीमध्ये मात्र, बंदचा कोणताही परिणाम दिसून आला नाही.  बाजार समितीमध्ये नेहमीसारखीच मोठी गर्दी पहायला मिळाली. जिल्ह्यातील एस टी बस सेवाही सुरळीत असल्याचे दिसून येत आहे.

मुंबई, ठाणे (Thane), नवी मुंबईतील (Navi Mumbai) व्यापार्‍यांनी या बंदला पाठिंबा (Maharashtra Band) दिला आहे. येथील बेस्ट, पीएमपी बससेवा बंद आहे. टॅक्सी वाहतूक सुरु असली तरी तिला प्रतिसाद कमी आहे. ज्या रिक्षा, टॅक्सी सुरु आहेत. त्यांनी जादा पैसे घेण्यास सुरुवात करुन प्रवाशांच्या अडचणीत आणखीच भर टाकली आहे.

पुणे -बंगलोर महामार्गावर शिवसेनेचे आंदोलन

कोल्हापूर शिवसेनेच्या (Kolhapur Shivsena) कार्यकर्त्यांनी पुणे -बंगलोर महामार्गावर (pune bangalore highway)
आंदोलन करुन रस्ता रोको केला. सकाळी सुमारे १० मिनिटे त्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडला. महामार्गावरील वाहतूक रोखून धरली.
त्यानंतर पोलिसांनी या सर्व शिवसैनिकांना ताब्यात घेऊन रस्ता पुन्हा सुरु केला. महामार्गावरील वाहतूक अतिशय कमी आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यातून या बंदला उर्त्स्फुत प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
त्यामुळे राज्यात दुपारपर्यंत जवळपास सर्व व्यवहार ठप्प असल्याचे दिसून येत आहे.

हे देखील वाचा

Post Office Scheme | पोस्टाच्या ‘या’ 7 योजनांमध्ये करा गुंतवणूक, काही वर्षातच पैसे होतील दुप्पट; जाणून घ्या

Green Energy Sector | ग्रीन एनर्जी सेक्टरमध्ये Tata आणि Adani यांच्यावर आघाडी घेण्यासाठी मुकेश अंबानी यांनी खर्च केले 5800 कोटी; जाणून घ्या डिटेल्स

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Maharashtra Band | Maharashtra bandh erupts in state

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update