Maharashtra Band | महाविकास आघाडीच्या दुचाकी रॅलीमुळे फातिमानगर चौकातील सोलापूर रस्ता जाम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी (lakhimpur kheri) येथील हिंसाचाराच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची (Maharashtra Band) हाक महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) दिली आहे. आज सर्वत्र बंद पाळण्यात येत आहे. पुण्यातील वानवडीच्या संविधान चौकात (samvidhan chowk wanwadi) ‘संविधानाच्या’ प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन महाविकास आघाडीच्यावतीने दुचाकी रॅलीला सुरुवात झाली. आझादनगर, साळुंखे विहार, केदारीनगर, शिवरकर रस्त्यावरुन काढण्यात आलेल्या या दुचाकी रॅलीत सहभागी झालेले पदाधिकारी, कार्यकर्ते दुकाने बंद (Maharashtra Band) करण्याचे आवाहन करत होते. मुख्य सोलापूर रस्त्यावरील (Pune-Solapur Road) फातिमानगर चौकात ही रॅली आली असता वाहतूककोंडी झाली. त्यानंतर रॅली पुढे मार्गस्थ होताच वानवडीतील जनजीवन पुर्वपदावर आल्याचे पहायला मिळाले. दरम्यान, अनुचित प्रकार घडू नये म्हणून वानवडी पोलीसांकडून कडक बंदोबस्त तैनात होता.

फातिमा नगर चौकात या रॅलीत तिन्ही पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते गटागटांनी सहभागी झाले होते.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप,
माजी नगरसेवक शिवाजी केदारी, अभिजित शिवरकर, साहिल केदारी ही या रॅलीत सहभागी झाले.
यावेळी मोदी सरकार विरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली.
काही वेळानंतर रॅली जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाली.

वानवडी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष महेश पुंडे म्हणाले, लखीमपुर येथील हिंसाचार निंदनीय असून दोषींवर कारवाई झाली पाहिजे.
तेथे घडलेल्या घटनेमुळे महाराष्ट्र बंद (Maharashtra Band) करुन महाराष्ट्रातील व्यापारी, व्यावसायिकांना वेठिस धरणे चुकीचे वाटते.
या बंदला वानवडीमध्ये व्यापारी असोसिएशनचा पाठिंबा नाही.
पण दडपशाहीमुळे व्यापारीवर्गांनी आपली दुकाने बंद ठेवल्याचे त्यांनी सांगितले.

 

Web Title : Maharashtra Band | Pune-Solapur road jam at Fatimanagar Chowk due to Mahavikas Aghadi’s two wheeler rally

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | बारामतीमध्ये 34 वर्षीय ऑडिट सुपरवायझरची आत्महत्या

Maharashtra Band | आघाडीचा बंद हा ‘ढोंगीपणाचा कळस’, देवेंद्र फडणवीसांचा घणाघात (व्हिडिओ)

Ajit Pawar | सोमेश्वर कारखान्याला माझं उसाचं कांडक येत नाही, पण… – अजित पवार