Maharashtra Band | ‘महाविकास’ आघाडीनं पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला पुणे व्यापारी महासंघाचा पाठिंबा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लखीमपूर हिंसाचाराच्या (Lakhimpur violence) पार्श्वभूमीवर 11 ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’ (Maharashtra Band) करण्याची घोषणा राष्ट्रवादीचे (NCP) नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केली होती. महाराष्ट्र बंदमध्ये (Maharashtra Band) सरकारमधील इतर सहकारी पक्ष ही सहभागी झाले आहेत. शिवसेना (Shivsena) आणि काँग्रेसनंही (Congress) या बंदला पाठिंबा दर्शवला आहे. आता पुण्यातील पुणे व्यापारी महासंघाने (pune vyapari mahasangh) देखील या बंदला जाहीर पाठिंबा दिला आहे.

 

 

पुणे व्यापारी महासंघाने या बंदला पाठिंबा द्यावा यासाठी पुणे काँग्रेस शहराध्यक्ष रमेश बागवे (Ramesh Bagwe), राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap), शिवसेनेचे नेते प्रशांत बधे (Prashant Badhe), माजी आमदार मोहन जोशी (Mohan Joshi), रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या शिष्टमंडळानेपुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फतेचंद रांका (Fatehchand Ranka) यांची भेट घेतली होती. यावेळी झालेल्या चर्चेत पुणे व्यापारी महासंघाने बंदला पाठिंबा दिला आहे.

 

फतेचंद रांका यांनी सांगितले की, या शिष्टमंडळाने पुणे व्यापारी महासंघाला बंद (Maharashtra Band) पाठिंबा देण्याची विनंती केली होती.
मात्र, सध्या नवरात्रीचे दिवस असून कोरोना काळात व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. आता व्यवसाय सुरळीत होत आहे.
त्यावर शिष्टमंडळाने दिवसभर दुकाने बंद न ठेवता दुपारी तीन वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवण्याची विनंती केली होती.
त्यानुसार पदाधीकारी आणि सदस्यांची बैठक घेण्यात आली. महासंघाचे अध्यक्ष फतेचंद रांका, सचिव महेंद्र पितळिया, उपाध्यक्ष सुर्यकांत पाठक, रतन किराड, खजिनदार मनोज सारडा, सह सेक्रेटरी हेमंत शहा, कार्यकारिणीतील सदस्य नितीन काकडे आणि महासंघाचे इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

यामध्ये बहुतांश व्यापाऱ्यांनी दुपारी तीन वाजेपर्यंत दुकाने बंद ठेऊन महाराष्ट्र बंदला पाठिंबा देण्याची तयारी दाखवली.
त्यामुळे पुणे व्यापारी महासंघाकडून या बंदला पाठिंबा जाहीर करण्यात आला असून पुण्यातील व्यापारी दुपारी तीन वाजेपर्यंत आपली दुकाने बंद ठेवणार आहेत.

 

Web Title :-  Maharashtra Band | pune vyapari mahasangh supports Maharashtra Bandh called by maha vikas aghadi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 77 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | अधिकार्‍यांनीच एजन्सीबरोबर संगनमत करुन केला 20 लाखांचा घोळ ! महावितरणच्या दोघा अधिकार्‍यांसह चौघांवर गुन्हा दाखल

IAS Ankita Jain | पती IPS अधिकारी, आता पत्नी झाली IAS; UPSC परीक्षेत 2 वेळा नापास झाल्यानंतर असे मिळवले यश