शरद पवार यांच्या घरासमोरील आंदोलनात अजित पवार सहभागी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन 

पुणे शहर व जिल्ह्यात आज कडकडीत बंद पाळण्यात येत असून बारामती येथील शरद पवार याच्या निवासस्थानासमोर सकाळपासूनच ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आले आहे. या आंदोलनात अजित पवार हे देखील सहभागी झाले.

महाराष्ट्र बंद मुळे शहरात कडकडीत बंद

पुणे विभागातील सर्व एस टी बससेवा बंद ठेवण्यात आली आहे़ पुणे शहरातील स्वारगेट, पुणे स्टेशन, शिवाजीनगर येथील सर्व एस टी बसगाड्या सध्या बंद ठेवण्यात आल्या आहेत़ रस्त्यावर अगदीच तुरळक वाहतूक दिसत असून शहराच्या उपनगरासह मुख्य बाजारपेठ्या बंदमध्ये सहभागी झाल्याचे दिसून येत आहे. उपनगरात काही ठिकाणी कार्यकर्ते गटाने फिरुन उघड्या असलेल्या दुकानदारांना बंद करायला भाग पाडत होते. सोमवार पेठेत आंदोलकांनी सारस्वत बँकेचे शटर बंद करायला भाग पाडले.

पुणे जिल्ह्यातील ७ तालुक्यांमधील इंटरनेट सेवा बंद

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांनी ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे़ येथे आता शहरातील विविध भागातून कार्यकर्ते येत आहेत़ संपूर्ण शहर व उपनगरांमध्ये सध्या कडकडीत बंद पहायला मिळत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात बंदचा परिणाम; एसटी बसस्थानकांवर शुकशुकाट : शाळा, महाविद्यालये बंद

पिंपरी : ग्रामीण पोलिसांचा ‘ड्रोन कॅमेऱ्या’ने आंदोलनावर ‘वॉच’

[amazon_link asins=’B0756W2GWM’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’81755407-9ba1-11e8-98a4-6ffc211b4771′]