मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग रोखणाऱ्या आंदोलकांवर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

आरक्षण आणि विविध मागण्यासाठी राज्यात सकल मराठा क्रांती मोर्चाकडून गुरुवारी महाराष्ट्र बंद ची हाक देण्यात आली होती. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि ग्रामीण भागासह शहरात बंदला पाठिंबा मिळाला. गुरुवारी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गा देखील
मराठा आंदोलकांनी अडवला होता, त्यामुळे अनेक वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागला होता. यासंदर्भात तळेगाव पोलिसात १५० ते १७५ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. टाळ आणि मृदंगाच्या गजरात हे आंदोलन सुरू होते. द्रुतगती मार्ग हा तब्बल सहा तास रोखला गेला.
[amazon_link asins=’B075LHV5LL’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’78cab359-9c8a-11e8-8bc1-3306e6aa8ecb’]

संपूर्ण महाराष्ट्रात सकल मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी बंदची हाक दिली होती. लोणावळा रेल्वे स्थानकात एक्सप्रेस अडवली गेली होती. तर मुंबई-पुणे द्रुतगती मार्गा उर्से टोल नाका येथे शेकडोच्या संख्येत आंदोलकांनी रास्ता रोको केला. यावेळी आंदोलकांनी टाळ मृदंग आणि भजन कीर्तन करत सरकारचा निषेध केला. या आंदोलनाचे मोठ्या संख्येत रूपांतर झाला आणि पोलिसांनी आवाहन करून देखील जमाव हटण्यास तयार नव्हता. पोलिसांकडून वारंवार आवाहन करण्यात येत होतं. वेळ होत गेल्याने दोन्ही दिशेने कडील वाहतूक कोंडी झाली होती. शेकडो प्रवाशी वाहतूक कोंडीमुळे अडकून पडले होते. तब्बल सहा तासानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेत रस्ता मोकळा केला. याप्रकरणी तळेगाव पोलिसात १५० ते १७५ आंदोलकांवर जमाव जमवणे, रस्ता अडवणे, हायवे ऍक्ट ८ बी असे इतर ही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

[amazon_link asins=’B00L8PEEAI’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8560bf87-9c8a-11e8-8b88-1f11c5685bdb’]