पुणे : येरवडा, वडगावशेरी, चंदननगर-खराडी संपुर्ण बंद

पुणेः पोलीसनामा ऑनलाईन

सकल मराठा समाजाने पुकारलेल्या बंदमुळे येरवडा, वडगावशेरी, चंदननगर, खराडी, कल्याणीनगर , विमाननगर, मुंढवा ,कोरेगाव पार्क, म.हो.बोर्ड या भागामध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. या परिसरातील दुकाने, हॉटेल आणि आस्थापने शतप्रतिशत बंद होते.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदच्या पाश्वभूमीवर येरवडा, म.हो.बोर्ड, कल्याणीनगर, विमाननगर, रामवाडी, वडगावशेरी गावठाण, सोमनाथनगर, गणेशनगर, चंदननगर, खराडी या भागातील सर्व दुकाने, हॉटेल, भाजी मंडई, शाळा, महाविदयालय होते. यामुळे या भागातील रस्त्यावर शुकशुकाट होता.
[amazon_link asins=’B07B6SN496′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9cfdc2fd-9ba7-11e8-8552-8f799cb754e1′]
या परिसरातील फिनिक्स मॉल, ईशान्य मॉल मारिप्लेक्स मॉल बंद होते. सकल मराठा समाजाच्या युवकांनी चंदननगर, येरवडा, वडगावशेरी या भागामध्ये दुचाकी रॅली काढली. बंदच्या काळात कोणतेही दुर्घटना घडू नये यासाठी विमाननगर चौक, चंदननगर चौकात पोलिस बंदोबस्त होता. या भागातील अत्यावश्यक सेवा हॉस्पिटल आणि मेडिकल सुरू होते.

महाराष्ट्र बंद मुळे शहरात कडकडीत बंद

नगररस्त्यावर शुकशुकाट
पुणे नगर महामार्गावर येरवडा ते खराडी दरम्यान दररोज मोठ्या प्रमाणात वाहनाची वर्दळ असते. या रस्त्यावर सकाळी ९ ते ११ मोठया प्रमाणात वाहतुक कोंडी असते. पण आज सकल मराठा समाजाने पुकारलेल्या बंद मुळे नगररस्त्यावर शुकशुकाट होता.चौका-चौकात पोलिस बंदोबस्त होता.

पुणे जिल्ह्यातील ७ तालुक्यांमधील इंटरनेट सेवा बंद